विनय नातू कोकण पदवीधर मतदारसंघातून लढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

चिपळूण - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी भाजपने उमेदवार दिला नसला तरी कोकण पदवीधर मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेनेसमोर विनय नातूंच्या रूपाने भाजप  आव्हान उभे करण्याची शक्‍यता आहे. 

हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचाच बालेकिल्ला आहे परंतु राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडून काढली होती. मात्र, भाजप पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जूनमध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. 
-डॉ. विनय नातू,
माजी आमदार

राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार पळवापळवीचा अनुभव सर्वांना आला. त्यामुळे या निवडणुकीतही तशी शक्‍यता आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत १ लाख ९ हजार मतदार नोंदणी झाली होती. आगामी निवडणुकीसाठी आतापर्यंत ९० हजार २५२ इतकी मतदार नोंदणी झाली आहे. २० हजारांनी पदवीधर मतदार संख्या घटली आहे.

Web Title: Ratnagiri News Vinay Natu interested from Konkan Padvidhar