बहुउत्तरी शिक्षणपद्धती तयार करणार - तावडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चौकस व्हावी, या हेतूने एका प्रश्‍नाची पाच उत्तरे असू शकतात, अशी शिक्षणपद्धती तयार करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. एका प्रश्‍नाचे एकच उत्तर असते, अशी शिक्षणपद्धती असल्याने विद्यार्थी घोकमपट्टी करतात; पण नव्या पद्धतीने विद्यार्थी सर्व बाजूंनी विचार करतील, असा विश्‍वास शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. 

एका वर्गात "वर' या शब्दाला विरुद्धार्थी शब्द द्यायचा होता व सर्वांनी उत्तर लिहिले खाली; पण एका मुलीने हे उत्तर "वधू' असे लिहिले; मात्र बाईंनी ते चूक दिले. यावरून बहुउत्तरे असणाऱ्या शिक्षणपद्धतीचा विचार मनात आल्याचे तावडे यांनी सांगितले. 

Web Title: ratnagiri news vinod tawde education