esakal | आम्ही आमचं स्थलांतर आमच्या नातेवाईकांकडे करू; नागरिकांच प्रशासनाला उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही आमचं स्थलांतर आमच्या नातेवाईकांकडे करू; नागरिकांचं प्रशासनाला उत्तर

आम्ही आमचं स्थलांतर आमच्या नातेवाईकांकडे करू; नागरिकांचं प्रशासनाला उत्तर

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे (रत्नागिरी): अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोकणात ऑरेंज अलर्ट (Orange alert)दिल्याने हर्णे व पाजपंढरी(Herne and Pazpandhari)मधील लोकांना शासनाकडून स्थलांतराची सूचना मिळाली असली तरी पावसाचं प्रमाण सकाळच्या सत्रात कमी असल्यामुळे येथील नागरिकांनी स्थलांतरण केलेले नव्हते. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता तेंव्हा साधारण जोरदार पाऊस चालू झालाच तरचं आम्ही आमचं स्थलांतर आमच्या नातेवाईकांकडे करू; असे येथील नागरिकांनी सांगितले. (ratnagiri-orange-alert-update-marathi-news)

दापोली तालुक्यामध्ये आज कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याच्या तंत्रज्ञ- डॉ.शीतल यादव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८:३० ते २:३० वाजेपर्यंत ५६.६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. सकाळच्या सत्रात पावसाचं प्रमाण कमीच होते. जिल्हाप्रशासनाकडून पुढील दोन दिवसात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे धोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन कमिटी प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना स्थलांतर होण्याच्या सूचना देत होती. कारण एक बाजूला डोंगर तर एक बाजूला समुद्र किनारपट्टी असल्यामुळे दोन्ही ठिकाणच्या लोकांना सतर्क करून त्यांचं स्थलांतरण हे आपत्ती व्यवस्थापनाच काम होत.त्याप्रमाणे लोकांनी नातेवाईकांकडे स्थलांतर करणार असल्याचे यावेळी सांगितले.

शासनाच्या स्थलांतर ठिकाणी मूलभूत सुविधांचाच अभाव असल्या कारणाने नागरिक याठिकाणी स्थलांतर होत नाहीत ही समस्या नेहमीचीच होऊन बसलेली आहे. कालच्या रात्री मात्र लोकांनी तात्पुरते स्थलांतर केले परंतु सकाळपासून पावसाचं प्रमाण कमी होत त्यामुळे लोकांनी आपापल्या घरात राहण पसंत केलं. रात्री जर पावसाचं प्रमाण वाढलं तरच आम्ही आमच स्थलांतर करू; असे येथील नागरिकांनी सांगितले.या स्थलांतरामध्ये हर्णेमधील ८७ घरांमधील आणि ४३१ लोकांनां तर पाजपंढरी मधील १२४ कुटुंबातील ७०४ लोकांना हलविण्याच्या सूचना तथा नोटिसा देण्यात आल्या आहेत. सदर ठिकाणच्या ग्रामस्थांच्या बैठक घेऊन स्थलांतर होण्याचे कारण पटवून काही अडचण आल्यास शासनाकडे त्वरित संपर्क साधायचा आहे असे अधिकाऱ्यांकडून या नागरिकांना सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत; नारायण राणेंचा दावा

आम्हाला शासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या जवळच्याच नातेवाईकांकडेच काल रात्री झोपायला गेलो होतो. आज सकाळपासून पाऊस कमी असल्यामुळे परत घरी आलो आणि आता रात्री जेवण करून त्यांच्याकडे परत जाणार आहोत; असे फत्तेगड येथील श्रीम. पेडेकर यांनी सांगितले.