भातपिकाच्या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक | Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भातपिकाच्या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक

रत्नागिरी : भातपिकाच्या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक

रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्‍या गावातील सुधारित हंगामाची पीक पैसेवारी ३१ ऑक्टोबरला जाहीर झाली. जिल्ह्यातील एकूण १ हजार ५३८ गावांपैकी १ हजार ५०३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जमीन महसुलात सूट मिळणे अशक्य आहे. ३५ गावांमध्ये भातपीक घेतले जात नसल्यामुळे पैसेवारी जाहीर झालेली नाही.

नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून शेतकऱ्या‍ला मिळणारे विविध प्रकारचे साहाय्य हे पीक पैसेवारीवर अवलंबून असते.

हेही वाचा: हडपसर : दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुकांची मोर्चेबांधणी

कृषी विभागाकडून काढलेल्या उत्पन्नाचे मूल्यांकन १०० पैसे समजले जाते. त्यानुसार पाहणी केलेल्या गावातील हेक्टरी उत्पादन आणि प्रमाण उत्पादन यांच्या आधारावर पैसेवारी काढली जाते. ज्या गावातील पैसेवारी ५० पैसे किंवा त्याहून कमी असेल, तर त्या गावातील जमीन महसुलात सूट देण्यात येते. ते क्षेत्र टंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते. मात्र, शेतकऱ्‍यांना सरसकट सवलती दिल्या जात नाहीत. काही शेतकऱ्‍यांच्या विहिरी असल्यामुळे त्या पाण्यावर बागायती करू शकतात.

अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्‍यांनाच टंचाईसंबंधीच्या सर्व सोयी देण्यात येतात. टंचाई परिस्थितीत वीज बिलाची थकबाकी असली तरीही त्यांचा विद्युत प्रवाह खंडित करू नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरला सुधारित हंगामी पीक पैसेवारी जाहीर केली आहे. यंदाही १ हजार ५३८ पैकी १ हजार ५०३ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. उर्वरित ३५ गावांमध्ये भातपीकच नाही. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर होईल.

हेही वाचा: हडपसर : साडेसतरानळी येथील आगीत एकाचा होरपळून मृत्यू

अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला

शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कोकणात ३१ ऑक्टोबरला सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात येते, तर १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर झाली आहे.

तालुका पैसेवारीची गावे

मंडणगड- १०९ ,दापोली- १७४ ,खेड*१९८ ,चिपळूण*१६७ ,गुहागर*१२२ ,संगमेश्‍वर*१९४ ,रत्नागिरी*१८९ ,लांजा*१२३ ;राजापूर*२२७

भातपीक घेतले जात नसलेली ३५ गावे -

दापोली तालुक्यातील ३ ,खेडमधील १ ,रत्नागिरीतील १७ ,संगमेश्वरमधील ४ ,राजापूर तालुक्यातील १०

loading image
go to top