Rare White Stork Spotted in Ratnagiri
esakal
रत्नागिरी : हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणात परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू होते. यंदा रत्नागिरी तालुक्यात अत्यंत दुर्मीळ अशा युरोपियन ‘पांढऱ्या करकोच्या’चे (White Stork - Ciconia ciconia) दर्शन झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून या परदेशी पाहुण्याने रत्नागिरी परिसरातील चंपक मैदानावर मुक्काम ठोकला असून, रत्नागिरी तालुक्यात हा पक्षी बहुदा पहिल्यांदाच आढळून आल्याने पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये मोठा उत्साह (European White Stork sighting in Maharashtra) होता.