esakal | Ratnagiri : ‘सकाळ’ उघडला अन् हात जोडले गेले
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri : ‘सकाळ’ उघडला अन् हात जोडले गेले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळेच्या श्रींचे घरबसल्या दर्शन दै. ‘सकाळ’ने फ्रेंच विंडोच्या माध्यमातून शनिवारच्या (ता. ११) अंकात दिले. या प्रयोगाला जिल्ह्यातील वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कोरोनातील परिस्थितीत ऐन गणेशोत्सवात अष्टविनायकांचे दर्शन अन् त्यांची नेमकी माहिती ‘सकाळ’ उघडल्या उघडल्या वाचायला मिळाली अन् प्रभातीची सुरवात भक्तीपूर्ण वातावरणात होऊन हात जोडले गेले, अशा आशयाच्या प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केल्या.

आजचा अंक खूप छान झाला आहे. स्थानिक दैनिक असा प्रयोग करत नाही. ओंकार माहात्म्य व श्री गणेश उत्सव यांची माहिती खूप छान दिली आहे, गणपतीपुळेतील श्रींचे अन् मंदिराचे छायाचित्र म्हणजे दर्शन पर्वणीच ठरली, अशी भावोत्कट प्रतिक्रिया मालगुंड येथील महेश बापट यांनी दिली. या माध्यमातून गणपतीपुळेच्या गणपतीचे दर्शन घरोघरी झाले. असा प्रयोग चांगला असल्याचेही बापट यांनी सांगितले. राज्यात अशाप्रकारचा प्रयोग अनेकवेळा मोजक्याच दैनिकांकडून केला जात आहे.

हेही वाचा: Ratnagiri : अतिक्रमणावर जप्तीचा उतारा

''फ्रेंच विंडो'' याबाबत शहरी भागातील विक्रेत्यांना माहिती आहे; मात्र ग्रामीण भागात याची माहिती नसल्यामुळे वितरकांमध्ये कुतूहल होते. या प्रयोगाबाबत अनेक वितरकांनीही दूरध्वनीवरून माहिती घेतली. याचे वेगळेपण लक्षात आल्यानंतर रत्नागिरी तालुक्यासह अन्य तालुक्यातील अनेक गावांत पेपरही शिल्लक राहिला नाही. चांदेराई, ओझरे खुर्द, नेवरे येथील वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. देवरूख मधली आळीतील तुषार गोविंद सरदेशपांडे म्हणाले, आज घरबसल्या ''सकाळ''मुळे पुळ्याच्या गणपतीचे दर्शन झाले.

प्रयोग वारंवार करत राहावे

या प्रयोगाबाबत साखरपा येथील वामन विठ्ठल कात्रे म्हणाले, आज सकाळी दै. ‘सकाळ’ वाचल्याचे समाधान झाले. सुरवातीला गणपतीपुळेच्या श्रींचे दर्शन, नंतर अष्टविनायक दर्शन, आजच्या बातम्याही झकास आणि वेगळे लेख वाचायला मिळाले. असे प्रयोग वारंवार करत राहावे.’’

loading image
go to top