Ancient temple discovery in Ratnagiri
esakal
संगमेश्वर : तालुक्यातील माखजनजवळील धामापूर गावात शतकानुशतके काळाच्या पडद्याआड राहिलेल्या प्राचीन इतिहासाचे अवशेष समोर आले (Dhamapur ancient temple ruins in Sangameshwar) आहेत. झाडाझुडपांनी वेढलेल्या परिसरात ऐतिहासिक राजवाड्याचे भग्नावशेष आणि प्राचीन मंदिराचे अवशेष आढळले असून, गर्भगृहातील देखणी मूर्ती या परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देत आहे. या वास्तूंचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन, संशोधन आणि संवर्धन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.