leopard enters house in Sangameshwar Ratnagiri
esakal
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने घरात घुसून कोंबड्यांवर हल्ला केला. मात्र, त्याचवेळी घरात अचानक समोर आलेल्या बिबट्याशी प्रतिभा प्रकाश दळवी (वय ६०) यांनी तब्बल अर्धा तास जीवाची पर्वा न करता संघर्ष (Sangameshwar Leopard News) केला. त्यांच्या अफाट धाडसामुळे अखेर बिबट्याने घराबाहेर पडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, या झटापटीत प्रतिभा दळवी गंभीर जखमी झाल्या आहेत.