Sharad Sampat 2026
esakal
रत्नागिरी : दरवर्षी २२/२३ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर दिवस आणि रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे समान असतात. खगोलशास्त्रामध्ये या विशेष दिवसाला ‘शरद संपात’ किंवा ‘विषुवदिन’ असे म्हटले (Autumn Equinox September 23) जाते. या खगोलीय घटनेचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी सूर्यबरोबर अचूक पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यामुळे नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या दिवशी सूर्योदयावेळी निरीक्षण करून आपल्या घराची व परिसराची अचूक पूर्व दिशा निश्चित करावी, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले.