Konkan - जिल्ह्यातील सोलगाव - बारसूवासियांना हवा रिफायनरी

konkan
konkan esakal
Summary

सोलगाव -बारसू परिसरामध्ये शासनाच्या माध्यमातून विकासाची भाग्यरेषा बदलणार्‍या रिफायनरी प्रकल्प उभारणी करावी

राजापूर : स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी नाही, वैद्यकीय सुविधांची वानवा. बदलत्या हवामानामुळे आंबा-काजू व्यवसाय धोक्यात आलेला आहे. नोकरी, शिक्षणासाठीच्या स्थलांतरामुळे गावांमुळे अनेक घरे बंदस्थितीमध्ये असतात. त्यामुळे सोलगाव-बारसू (solgav-barsu) परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. सोलगाव -बारसू परिसरामध्ये शासनाच्या माध्यमातून विकासाची भाग्यरेषा बदलणार्‍या रिफायनरी प्रकल्प (rajapur refinery) उभारणी करावी, अशी मागणी तालुक्यातील बारसू, सोलगाव, नाटे दशक्रोशीतीत शेकडो ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत (vinayak raut) आणि आमदार राजन साळवी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली.

रिफायनरी प्रकल्पासंबंधित खासदार राऊत आणि आमदार साळवी यांची शासकीय विश्रामगृहावर डॉक्टर, वकील, व्यापारी, आंबा बागायतदार, मच्छीमारांसह सोलगाव-बारसू, नाटे, धोपेश्‍वर भागातील शेकडो ग्रामस्थांनी भेट घेतली. या वेळी रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार, अ‍ॅड. यशवंत कावतकर, नगराध्यक्ष जमीर खलिफे, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, धोपेश्‍वरचे सरपंच दत्ताराम करंबेळकर, शिवसेना विभागप्रमुख संतोष हातणकर, देवाचेगोठणेच्या सेनेच्या महिला संघटक मनाली करंजवकर आदी उपस्थित होते.

konkan
महापुराने बरबाद झालेल्या 'लोटिस्मासाठी' सामंतांची मोठी घोषणा

नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे, प्राची शिर्के, सौ. करंजवकर, श्री. बांदकर, गौरव परांजपे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास पाटील, सूरज पेडणेकर, विनायक दिक्षीत आदींनी रिफानरी प्रकल्पाची राजापूर तालुक्यासह सोलगाव बारसू परिसरामध्ये उभारणी का करणे गरजेचे आहे, आदींविषयी माहिती देत रिफायनरी व्हावी, अशी मागणी केली.

प्रकल्पाची का उभारणी व्हावी..

  • अपुरा रोजगार

  • अपुऱ्‍या वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा

  • आंबा बागायतदारांच्या व्यथा

  • मच्छीमारांच्या समस्या

  • महिला बचत गटांच्या समस्या

  • बहुतांश भाग कातळपड

konkan
'आता पुढचा नंबर अनिल परबांच्या रिसॉर्टचा'

रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी चर्चेत असलेल्या सोलगाव-बारसू परिसरामध्ये बहुतांश भाग कातळपड परिसर आहे. या भागामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणी झाल्यास एकही घर वा मंदिराचे विस्थापन होणार नाही. सोलगाव-बारसूपासून काही किमी अंतरावर समुद्र असल्याने त्याचाही आपसूकच फायदा रिफायनरी प्रकल्पाला होणार असल्याची बाब अ‍ॅड. शशिकांत सुतार आणि अ‍ॅड. यशवंत कावतकर यांनी साऱ्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

जिल्ह्याच्या विकासाला चालना

अ‍ॅड. सुतार यांनी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी नेमकी का व्हावी, याबाबत सांगितले. सोलगाव-बारसू परिसरात प्रकल्प झाल्यास राजापूरचाच नव्हे, तर रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाला शासनाकडून मंजूरी मिळावी, अशी मागणी केली.

konkan
तब्बल 2 वर्षांनी दापोलीच्या 'त्या' डॉक्टरवर गुन्हा दाखल    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com