esakal | रत्नागिरीत संचारबंदी मात्र या सेवांना सुट...
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri start curfew but Exempt from these services kokan marathi news

रत्नागिरीत आतापर्यंत एकच पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. खबरदाची योजना म्हणून मुंबई, पुण्यातून नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरीत संचारबंदी मात्र या सेवांना सुट...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाच्या (कोव्हिड- 19) पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश अलर्ट झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही तातडीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूसह वृत्तपत्र, पत्रकार, छायाचित्रकार आणि वितरण करणार्‍या प्रतिनिधींना कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

300 रुग्णांना क्वारंटाईन ​

रत्नागिरीत आतापर्यंत एकच पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. खबरदाची योजना म्हणून मुंबई, पुण्यातून नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार लोकांना क्वारंटाईन करून ठेवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. सुमारे 300 रुग्णांना क्वारंटाईन करून ठेवले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन केले आहे. एसटी, रेल्वे पूर्ण ठप्प आहे. तसेच जिल्ह्यात येणार्‍या खासगी गाड्यांवर बंदी आणली आहे. शहरी भागात संचारबंदी लागू केली आहे.

हेही वाचा- बाबांनो तब्येतीची काळजी घ्या... ​या सेवा राहणार सुरु

या सेवा राहणार सुरु
अत्यावश्यक सेवा असणारे किराणा माल, भाजीपाला व दूध यासाठी दुकाने सुरू आहेत. तसेच अहोरात्र बातम्यांसाठी मेहनत घेणार्‍या वृत्तपत्र, पत्रकार, छायाचित्रकार आणि वितरण करणार्‍या प्रतिनिधींना कोणतीही अडचण नाही. पण पत्रकारांनी ओळखपत्र वापरावे व हेल्मेटचा वापर करावा. अत्यावश्यक सेवेसह वृत्तपत्रे सुरू राहणार, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिथे पेपर लाईन सुरू आहे, तेथे वितरण प्रतिनिधी नक्की पेपर वितरित करतील, याची खात्री बाळगावी. अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणेकडुन पत्रकार, वृत्तपत्र आणि वितरकांना अटकाव केला जात होता. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी तसे आदेश दिले आहेत.                                         

loading image