बाबांनो तब्येतीची काळजी घ्या... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

आमच्यासाठी तुम्ही जिवाची पर्वा न करता, रस्त्यावर अहोरात्र राबतात, तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. बाळांनो! तुम्ही, चांगले निरोगी राहा, बस्स एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देते, अशा भावना व्यक्त करत एका आईने बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांचे औक्षण केले. या स्नेह आपुलकीने भरलेल्या आशीर्वादाची ऊर्जा अंगी निर्माण झाल्याचा भावना आज तीन बत्ती चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी अनुभवली. 

कोल्हापूर : आमच्यासाठी तुम्ही जिवाची पर्वा न करता, रस्त्यावर अहोरात्र राबतात, तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. बाळांनो! तुम्ही, चांगले निरोगी राहा, बस्स एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देते, अशा भावना व्यक्त करत एका आईने बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांचे औक्षण केले. या स्नेह आपुलकीने भरलेल्या आशीर्वादाची ऊर्जा अंगी निर्माण झाल्याचा भावना आज तीन बत्ती चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी अनुभवली. 

जनता कर्फ्यूसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोरोनाला प्रतिबंध करायचा असल्याने नागरिकांनीही या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी दौलतनगर, तीन बत्ती चौकात पेट्रोलिंगचे काम आयबाईकचे प्रमुख सहायक फौजदार संदीप जाधव, किशोर दुम, गौरव चौगले, सुनील घुमाई यांचे पथक राजारामपुरी परिसरात गस्त घालत होते. घराबाहेरील नागरिकांना घरात जाण्याच्या सूचना देत होते. डोक्‍यावर उन चढत होते. हे पथक दौलतनगर तीन बत्ती चौकात गेले. तेथे त्यांनी नागरिकांना सूचना करण्यास सुरवात केली. त्यांचे हे काम येथे राहणाऱ्या अक्काताई शामराव चव्हाण यांनी पाहिले.

त्यांनी या पथकाला घरी बोलवले. त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. इतकेच नव्हे तर औक्षण करून बाबांनो! तब्येतीची काळजी घ्या, माझ्यासारख्या लाख मांताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, असा अशीर्वाद दिला. एका मातेकडून मिळालेल्या मायेने पोलिसही भारावून गेले. आशीर्वादाची ऊर्जा घेऊन हे पथक बंदोबस्तासाठी रवाना झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of your health ...