esakal | Ratnagiri : ३१,१४० चाकरमान्यांची चाचणी करा
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri : ३१,१४० चाकरमान्यांची चाचणी करा

Ratnagiri : ३१,१४० चाकरमान्यांची चाचणी करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून आलेल्यांपैकी सुमारे तीस हजारांहून अधिक चाकरमान्यांची कोरोना चाचणी तत्काळ करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. गावपातळीवर होणाऱ्या चाचण्यांकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे चाकरमान्यांच्या चाचण्यांवर भर दिला जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर करतानाच लशींचे दोन डोस घेतलेले किंवा आरटीपीसीआर चाचणी केलेल्या चाकरमान्यांना प्रवेश देण्यात येणार होता. चाचण्या न केलेल्यांची यादी महामार्गावरील चेकपोस्टवर घेतली होती. ती यादी दर दिवशी ग्रामकृतीदलाकडे सुर्पूद केली आहे. गावपातळीवर आरोग्य यंत्रणेकडून त्यांच्या चाचण्या करणे बंधनकारक होते.

परंतु गणेशोत्सवाच्या घाईगडबडीत गावात आलेल्या चाकरमान्यांच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष झाले. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात सुमारे १ लाख ९०० चाकरमानी आले आहेत. त्यात रेल्वेतून सुमारे ३१ हजार, एसटी बसने २४ हजार, खासगी बसने अडीच हजार आणि खासगी वाहनातून २२ हजार २०० चाकरमानी आले.

हेही वाचा: देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर होणार सुरु

गणेशोत्सव सुरु होऊन दोन दिवस झाले आहे. चाचण्यांची संख्या कमी झाल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राना पत्र काढून तत्काळ चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे न झाल्यास त्या-त्या आरोग्य केंद्रातील जबाबदार अधिकाऱ्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांपुढे खुलासा सादर करावा असे सूचित केले आहे. आरोग्य यंत्रणेच्या चाचण्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

नेमके झाले काय

  1. जिल्ह्यात १ लाख ९०० चाकरमान्यांचे आगमन

  2. दोन डोस,आरटीपीसीआर झालेल्याना सवलत

  3. ६१९१६ चाकरमान्याना मिळाला थेट प्रवेश

  4. प्रशासनाकडून ७२५ आरटीपीसीआर चाचण्या

  5. ८ हजार १३५ चाकरमान्यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट

परिणाम काय झालाय

  1. ३१ हजार १४० जण कोरोना चाचणीविना गावात

  2. त्यांची नावे ग्रामकृतीदलाकडे पाठविण्यात आली

  3. चाकरमान्यांच्या चाचण्या करण्यात दुर्लक्ष

  4. प्राथमिक आरोग्य केंद्रांना चाचण्याच्या सूचना

  5. आव्हानाला प्रतिसाद मिळेल का याबाबत साशंकता

loading image
go to top