कलिंगड स्वस्त विकल्याने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

तीन संशयितांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

रत्नागिरी : स्वस्त दराने कलिंगड विकल्याच्या रागातून प्रौढाला लोखंडी सळईने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अंकुश वासुदेव म्हात्रे (वय 28, रा. तांबटआळी, रत्नागिरी), मिथून शिंदे (वय 25), आकाश ढाले (वय 25 दोघांचेही पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना रविवारी (ता. 17) रात्री साडेनऊच्या सुमारास रत्नागिरी ते कुवारबाव रस्त्यावर रेल्वेब्रीजच्या अलीकडे फळाच्या स्टॉलजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ नारायण म्हात्रे (वय 41, रा. रसाळवाडी - शांतीनगर, रत्नागिरी) यांचा व संशयित यांचे कलिंगडाचे दुकान आहे.

हे पण वाचा - वाहनधारकांना फसवणारे ऊसतोड मुकादम जेरबंद

 

एकनाथ म्हात्रे कलिंगड स्वस्त विकत विकतात याचा राग धरून संशयित अकुंश म्हात्रे यांनी एकनाथ यांना शिवीगाळ केली तर मिथून याने त्यांना खाली पाडून हाताच्या ठोशाने मारहाण केली व आकाश ढाले याने दुकानाच्या छत्रीला लावलेली लोखंडी सळई काढून डोक्‍यात मारून दुखापत केली. या प्रकरणी एकनाथ म्हात्रे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri three people beating

Tags
टॉपिकस
Topic Tags: