
30 लाख रुपयाचा गंडा घालून वर्षापासून पसार झालेल्या तीन मुकादमांना जेरबंद करण्यात शिरोळ पोलिसांना यश आले आहे
शिरोळ - शिरोळ व अर्जुनवाड येथील तीन वाहनधारकांना ऊसतोड मजूर पुरवितो असे सांगून सुमारे 30 लाख रुपयाचा गंडा घालून वर्षापासून पसार झालेल्या तीन मुकादमांना जेरबंद करण्यात शिरोळ पोलिसांना यश आले आहे.
अर्जुनवाड येथील प्रशांत पाटील यांना ऊसतोड मजुरांची टोळी पुरवितो म्हणून सुखदेव रावण बरडे (डोंगरपिंपळा, ता. आंबेजोगाई) याने 8 लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र मजुरांची टोळी न पुरविता तो पसार झाला होता. शिरोळ येथील उत्तम छानदेव देशमुख यांनाही टोळी देतो असे सांगून संशयित भास्कर रोहिदास राठोड (बेलोरे, ता. जिंतूर) याने 12 लाख रुपये घेऊन पसार झाला होता. अर्जुनवाड येथील विठ्ठल पाटील यांच्याकडून 8 लाख रुपये घेऊन राजेंद्र महादेव गुगवाड (शेड्याळ, ता. जत) पसार झाला होता.
सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ सुळ, ज्ञानेश्वर सानप, हणुमंत माळी, ताहीर मुल्ला यांच्या पथकाने विविध ठिकाणांहून, बरडे, राठोड व गुगवाडे या मुकादमांना पकडले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
हे पण वाचा - शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचा कट यशस्वी होऊ देणार नाही ; माजी खासदार राजू शेट्टी
संपादन - धनाजी सुर्वे