sakal
रत्नागिरी: महायुतीतर्फे ३२ जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले असून, त्यात शिवसेनेचे २६ तर भाजपचे सहा उमेदवार आहेत. नगराध्यक्षपदाचा उमेदवार पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे जाहीर केला असून, शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी दिली आहे. रत्नागिरी शहर विकास हाच आमचा ध्यास असून, वर्षामध्ये रत्नागिरी स्मार्टसिटी म्हणून विकसित होईल. अर्ज भरतानाची उपस्थिती पाहिली तर महायुतीचा विजय निश्चित आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.