Ratnagiri tourist rush
esakal
रत्नागिरी : ऑक्टोबर हिटचा तडाखा राज्यभर जाणवत असतानाच मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमधील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत गणपतीपुळे मंदिरात सुमारे ६५ हजार पर्यटकांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर दापोली, गुहागरमध्येही पर्यटकांचा (Ganpatipule tourism) ओघ होता. त्यामुळे निवास व्यवस्थेसह हॉटेल, फेरीवाले यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असतानाच पर्यटकांनी सुटी काळात फिरण्याला पसंती दिली आहे. या कालावधीत जिल्ह्यात कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून केला जात आहे.