esakal | रत्नागिरी: समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छता पाहून पर्यटकांनी फिरवली पाठ । Beach
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छता पाहून पर्यटकांनी फिरवली पाठ

समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छता पाहून पर्यटकांनी फिरवली पाठ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी शहर व परिसर हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा आहे. मनमोहक नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्रकिनारे हे पुण्यामुंबईसह राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. कोरोनानंतर आता हळूहळू पर्यटन सुरू होत आहे. परंतु गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणून ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर मात्र गटाराचे पाणी वाहत असल्यामुळे या परिसरात पर्यटक फिरण्यास येत नाही. अस्वच्छता पाहून काही पर्यटक चक्क वाईट शब्दांत बोलतात आणि निघून जातात, अशा गलिच्छ वातावरणामुळे पर्यटन वाढणार कसे? हा प्रश्न आहे.

हेही वाचा: मौन चाफा : तगरीचे दिवस...

मांडवी जेट्टी परिसर, समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. त्यामुळे लाखो पर्यटक या किनाऱ्यावर येऊन जातात. गणेश विसर्जन असो वा दसऱ्याला देवींचे विसर्जन असो येथे गर्दी पाहायला मिळणारच. या किनाऱ्यावर विविध व्यवसाय करून अनेक लोक आपली उपजीविका करतात. यामध्ये भेळ, स्नॅक्स सेंटरचालक, लहान मुलांची खेळणी चालक, घोडेस्वार, उंट सफारी, फुगेवाले आणि अनेक प्रकारची खेळणी विक्रेता तसेच भुईमुगाच्या शेंगा विक्रेते असे अनेक जणांचा समावेश आहे. परंतु किनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे त्यांच्या विक्रीवरही परिणाम होत आहे. गटारातून येणारे सांडपाणी थेट किनाऱ्यावर येत असल्यामुळे पर्यटक फक्त किनाऱ्याचे दर्शन घेऊनच परत जात आहेत.

पर्यटक आल्या पावली परत

जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबरला रत्नागिरी पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे पर्यटन महोत्सव साजरा झाला. यात जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले. पर्यटन वाढण्यासाठी काय केले पाहिजे, यावर त्यात मंथन करण्यात आले. परंतु, रत्नागिरी शहरातील मांडवी पर्यटनस्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर पर्यटक आल्या पावली परत जात असल्याने सुधारणेची गरज आहे. नगरपालिकेने यावर तत्काळ गटाराची सफाई किंवा पाईपलाईन दुरुस्ती करण्याची मागणी येथील काही लोकांनी केली.

loading image
go to top