सभापतींपाठोपाठ रत्नागिरी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांचा राजीनामा 

Ratnagiri Z P President Rohan Bane Resign
Ratnagiri Z P President Rohan Bane Resign

रत्नागिरी - जिल्हा परिषद विषय समिती सभापतींपाठोपाठ अध्यक्ष रोहन बने यांनी पदाचा राजीनामा मंगळवारी (ता. 2) कोकण आयुक्‍तांकडे सादर केला. बनेंच्या राजीनाम्यामुळे अध्यक्षांचा पदभार उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्याकडे देण्यावर शिक्‍कामोर्तब झाला. 

पदाधिकारी खांदेपालटावरून रत्नागिरी जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत आली आहे. पहिल्या दिवशी विषय समिती सभापतींसह पंचायत समिती सभापतींनी राजीनामे सादर केले; परंतु ते पक्षाकडे ठेवण्यात आले. त्यामुळे मुदतवाढीची शक्‍यता वर्तविण्यास सुरवात झाली. त्याला संपर्क प्रमुखांनीही दुजोरा दिला. अखेर सोमवारी (ता. 1) उपाध्यक्ष वगळता अन्य सर्व सभापतींचे राजीनामे मंजूर करण्यात आले. मुदतवाढीची शक्‍यता बारगळल्यानंतर अध्यक्षपदाच्या पदभाराचा प्रश्‍न निर्माण झाला. संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी उपाध्यक्षांसह सर्व सभापतींना राजीनामे सादर करण्याचे आदेश दिले होते.

आयत्यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी अध्यक्षपदाचा पदभार काही दिवस आपल्याकडे राहावा यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे सोमवारी उपाध्यक्षांचा राजीनामा थांबवण्यात आला आणि अध्यक्ष बने यांनी राजीनामा द्यावा, या दृष्टीने पावले उचलण्यास सुरवात झाली. अखेर रोहन बने यांनी पक्षाच्या आदेशाला अनुसरून मंगळवारी लगेचच कोकण आयुक्‍तांकडे राजीनामा सादर केला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष नाटेकर हे कामकाज पाहणार आहेत. पुढील निवड पंधरा दिवसात सभापती निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे समजते. 

अध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी 
अध्यक्षपदासाठी शिवसेनेतून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव, खेडचे अण्णा कदम, चिपळूणचे बाळशेठ जाधव यांच्यासह ज्येष्ठ सदस्य उदय बने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com