Raigad Press Club News: ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांना रायगड प्रेस क्लबचा ‘प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान’; पनवेलमध्ये दिमाखदार सोहळ्यात गौरव

तीन दशकांच्या निर्भीड पत्रकारितेला रायगड प्रेस क्लबचा मानाचा सन्मान; सामाजिक बांधिलकीची दखल घेत रवींद्रनाथ ओव्हाळ गौरवित
पाली, पनवेल येथे आयोजित सोहळ्यात मंत्री नितेश राणे व प्रवीण दरेकर यांच्या हस्ते 'निर्भीड पत्रकार पुरस्कार' स्वीकारताना ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ.

पाली, पनवेल येथे आयोजित सोहळ्यात मंत्री नितेश राणे व प्रवीण दरेकर यांच्या हस्ते 'निर्भीड पत्रकार पुरस्कार' स्वीकारताना ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ.

Sakal

Updated on

पाली : सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांना रायगड प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा मानाचा 'प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान' नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे आणि विधान परिषदेचे भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते ओव्हाळ यांना सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com