आपत्कालीन परिस्थितीसाठी आंबोली सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सिंधुदुर्गनगरी - आंबोली पर्यटन स्थळावर आता आपत्कालीन सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी आवश्‍यक असलेले साहित्य स्थानिक युवकांना देण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे तीन लाख रुपयांचे गिर्यारोहण साहित्य जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते आंबोली येथील प्रशिक्षित युवकांना आज वितरित करण्यात आले.

येथील जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, माऊंटेनियरिंग ग्रुप, कोल्हापूरचे नितीन ऐनापुरे, आपत्ती निवारण कक्षाच्या राजश्री सामंत तसेच आंबोलीतील गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले युवक उपस्थित होते.

आंबोली परिसरात पर्यटकांची वर्दळ असते. या परिसरात खोल दऱ्या आहेत. आंबोली घाटातील वाहनांचे अपघात, पर्यटक घसरून दरीत कोसळणे अशा आपत्कालीन परिस्थितीत हे प्रशिक्षित युवक वितरित केलेल्या साहित्याच्या सहाय्याने बचावकार्य करू शकतात. तसेच अपघातप्रसंगी दरीतून मृतदेह बाहेर काढणे आदी प्रकारची मदत करू शकतात. आंबोलीत येथील तीस युवकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आज विविध प्रकारचे रोप, स्ट्रेचर, हेल्मेट, असेंडर, डिसेंडर, कॅराबीनट, बिले रोप, फूल बॉडी हारनेस, सिंगल पुली, डबल पुली असे सुमारे एकवीस प्रकारचे साहित्य आज आंबोली टीमकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी आंबोली टीमचे प्रमुख संतोष पालयेकर, आबा नार्वेकर, संतोष गावडे, राजन माळकर, विराज परब, तसेच अमोल नाईक उपस्थित होते.

Web Title: Ready for emergencies