esakal | गुहागरमधील 199 खातेदारांना यामुळे मिळाला दिलासा...
sakal

बोलून बातमी शोधा

Reassurance to account holders in ratnagiri kokan marathi news

पूर्वलक्षी प्रभावाने दस्तवसुली न करण्याच्या सूचना येथील तहसीलदारांनी दिल्या आहेत. 

गुहागरमधील 199 खातेदारांना यामुळे मिळाला दिलासा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : पूर्वलक्षी प्रभावाने दस्तवसुली न करण्याच्या सूचना येथील तहसीलदारांनी दिल्या आहेत. त्यामुळे गुहागरमधील 199 खातेदारांना दिलासा मिळाला आहे. गुहागर तालुका पत्रकार संघाने तलाठी खंडेराव कोकाटे, मंडल अधिकारी शशिकांत साळुंखे व तहसीलदार लता धोत्रे यांच्याकडे पूर्वलक्षी प्रभावाने दस्त वसूल केल्याने नागरिकांचा होणारा तोटा लक्षात आणून दिला. त्यानंतर हे आदेश देण्यात आले. 

ऑगस्ट महिन्यापासून महसूल विभागातील तलाठी, कोतवाल आदी कर्मचारी दस्त वसुलीची मोहीम उघडतात. या वर्षी मागील 6 वर्षांच्या दस्त भरण्याबाबतची मागणी महसूल विभागाकडून झाली होती. रक्कम छोटी असणार्‍या खातेदारांनी हा दस्त भरला. परंतु काही एकर बिनशेती जमीन असलेल्या, वाणिज्यिक वापरासाठी बिगरशेती जमीन खरेदी केलेल्या खातेदाराची रक्कम हजारांच्या पटीत वाढली. शहरातील एका खातेदाराला 8 वर्षांच्या दस्तापोटी 1 लाख 52 हजार (सुधारित दराप्रमाणे वर्षाचे 19 हजार) भरावे लागणार होते. काही नागरिकांनी राजकीय नेत्यांबरोबर चर्चा करून दस्त न भरण्याचा निर्णय घेतला. हा विषय गुहागर तालुका पत्रकार संघाने हाताळला.

हेही वाचा- चिपळूणात  बेकरीला लागली भीषण आग...

तालुका पत्रकार संघाने घेतला पुढाकार

पदाधिकार्‍यांनी गुहागरचे तलाठी खंडेराव कोकाटे यांची भेट घेतली. दस्ताचा नेमका विषय समजून घेतला. या विषयामध्ये महसूलमधील अन्य अधिकार्‍यांबरोबर चर्चा झाली. त्या वेळी हा निर्णय वरिष्ठ अधिकारीच घेऊ शकतात. आर्थिक वर्षाच्या अखेरीस शासनाकडून वसुलीचा तगादा मागे असल्याने आम्ही हा विषय तहसीलदारांसमोर ठेवू शकणार नाही असे काहींना सांगितले. त्यामुळे गुहागर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (ता. 2) तहसीलदार लता धोत्रें यांच्या समोर हा विषय ठेवला. गुहागर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांकडून 2012 पासून आजपर्यंत ग्रामपंचायत क्षेत्रातील दस्ताचा दर अधिक जिल्हा परिषद सेस व पंचायत समिती सेस असा दस्त वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा-  सुधारित दस्ताचा नागरिकांना आता बसणार फटका..

दस्ताची रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने

सुधारित दस्तापेक्षा ती रक्कम दुप्पट आहे. असे असताना महसूल विभाग सुधारित दस्ताची रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने का घेते? हा मुद्दा तहसीलदारांसमोर मांडण्यात आला. नोव्हेंबर 2018 च्या अधिसूचनेत उल्लेखलेला पूर्वलक्षी प्रभावाचा मुद्दा फरकाची रक्कम सुधारित दरापेक्षा कमी असेल अशा खातेदारांसाठी आहे, हे दाखवून देण्यात आले. त्यामुळे पत्रकार संघाचा मुद्दा मान्य करत तहसीलदार धोत्रे यांनी केवळ 2019-20 या आर्थिक वर्षातील दस्त वसूल करण्याच्या सूचना तलाठी कार्यालयाला दिल्या आहेत. 

हेही वाचा-  सावंतवाडीच्या त्या वादात ‘महाविकास’ची उडी.... ​
अकृषिक जमिन खातेदारांची संख्या
गुहागर नगरपंचायत हद्दीत अकृषिक जमिनीचा वापर करणार्‍या खातेदारांची संख्या 199 आहे. यामध्ये निवासी 143, वाणिज्यिक 52 आणि औद्योगिक 4 खातेदार आहेत.