कुटुंबीय झोपले निर्धास्त ; मात्र सारा संसार झाला खाक, कसा तो वाचा ...

refrigerator fire destroy kitchen contractors in lanja kokan marathi news
refrigerator fire destroy kitchen contractors in lanja kokan marathi news

लांजा (रत्नागिरी ) :  बंगल्याच्या स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटरने अचानक पेट घेतल्याने भडकलेल्या आगीत घरातील लाखो रुपयांचे सामान खाक झाले. काल (ता. २१) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शहरातील वैभव वसाहत रोडवरील तेलीवाडी नजीक हा प्रकार घडला. सुदैवाने आग वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत सुमारे नऊ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाले.

 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून माहितीनुसार

लांजातील ठेकेदार सुधीर भिंगार्डे यांचा वैभव वसाहत रोडवर दोन मजली बंगला आहे. या बंगल्यात सुधीर भिंगार्डे यांच्यासह त्यांचे संदीप, चंद्रशेखर व पंढरीनाथ हे तीन भाऊ कुटुंबीयांबरोबर राहतात. संदीप तथा बाबा भिंगार्डे काल रात्री झोपी गेले. त्यानंतर साधारणपणे साडेबाराच्या सुमारास बाबा भिंगार्डे यांना किचनमधून मोठा आवाज ऐकू आला. ते किचनमध्ये पाहण्यासाठी गेले असता, रेफ्रिजरेटर जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाणी पेट्‌त्या रेफ्रिजरेटरवर टाकले. मात्र, आग वाढत गेली. आग वाढत गेल्याने नेमके काय करावे, ते त्यांना समजेना. बाबा भिंगार्डे यांनी जळणाऱ्या रेफ्रिजरेटर जवळील भरलेले दोन गॅस सिलिंडर तात्काळ बाजूला केले. ओट्याखाली शेगडीला लावलेला सिलिंडर तसाच होता. अद्वैत पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक प्रताप जेधे व कर्मचारी संतोष कोत्रे व अस्लम बागवान हे अग्निशमनची पाच अग्निप्रतिरोधक यंत्रे घेऊन आले. आग लागलेल्या भागात घुसले व आगीवर नियंत्रण आणले. सिलिंडरही बाहेर काढला. 

तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
नगराध्यक्ष बाईत, राजू कुरूप, नंदराज कुरूप, प्रसाद भाईशेट्ये यांनी मदतकार्य केले. घटनास्थळी लोकही मग मदतीला धावून आले. प्रथम घरातील माणसांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांनतर घरातील मौल्यवान वस्तू व सामान बाहेर काढण्यात आले. तरीही  रेफ्रिजरेटर, सिलिंग पंखा, मोबाईल हॅंडसेट, एसी, लाकडी फर्निचर, सोफा, किचन ट्रॉली, मिक्‍सर, डायनिंग टेबल, इलेक्‍ट्रिक वायरिंग, कपडे, अन्नधान्य यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीत दगडांनी ठेचून  या शाळकरी मुलाचा केला खून.....
 

याशिवाय या आगीत किचनच्या सिलिंगला मोठा धक्का बसला. आहे. तीन तासांनी म्हणजेच साडेतीनच्या सुमारास भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. लांजाचे तलाठी हरिदास पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लांजा पोलिस ठाण्यातही या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक दिनेश आखाडे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com