

Mango cashew compensation konkan farmers
esakal
Farmers compensation news : हवामान बदलामुळे चालू हंगामात आंबा आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्य सरकारने बागायतदारांना हेक्टरी २२ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कृषी विभागाने बागायतदारांची माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, १५ मे पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.