सुधागड मधील जांभूळपाड्याजवळ गुरांचे अवशेष सापडले

अमित गवळे 
शनिवार, 23 जून 2018

पाली : सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा आणि वऱ्हाड गावच्या हद्दित कळंब-जांभुळपाडा मार्गावरील पुलानजीक शनिवारी (ता.२३) सकाळी मृत गुरांचे अवशेष सापडले. या पुलानजीक झाडाच्या मागच्या बाजूला जनावरांचा पोटला, आतडी व रक्त पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती ग्रामस्तांनी पोलीसांना दिली. पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी एस. बी. तडवी, एस.एस. खेडेकर, नरेश जाधव, आर. डी.

पाली : सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा आणि वऱ्हाड गावच्या हद्दित कळंब-जांभुळपाडा मार्गावरील पुलानजीक शनिवारी (ता.२३) सकाळी मृत गुरांचे अवशेष सापडले. या पुलानजीक झाडाच्या मागच्या बाजूला जनावरांचा पोटला, आतडी व रक्त पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती ग्रामस्तांनी पोलीसांना दिली. पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी एस. बी. तडवी, एस.एस. खेडेकर, नरेश जाधव, आर. डी. कांदे तसेच हेदवली पोलीस पाटील भगवान काळभोर आदिंसह पशुवैद्यकीय अधिकारी व्हि.के.पाटील व सुनिल कदम यांनी घटनास्थळी पोहचवून अवशेषांचे नमुने घेतले. हे अवशेष तपासणीकरीता फॉरिन्सिक लॅब मुंबई येथे पाठविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी सांगितले. 

याबाबत पाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधागडसह रायगड जिल्ह्यात गुरांची संख्या जास्त आहे. गुरे मालकांनी आपापली गुरे मोकाट न सोडता गोठ्यात बांधून ठेवणे गरजेचे आहे. तसेच चरण्यासाठी रानात गुरे गेल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास गुराखी असावा जेणेकरुन रोजच्या रोज गुरे वेळेत घरी येतील. व गुरे चोरीचे प्रमाण कमी होईल. असे आवाहन पाली पोलिसांनी केले आहे.

Web Title: The remains of cattle were found near Jambhulpada in Sudhagad