रेस्क्यू ऑपरेशनंतर बिबट्याची झाली सुटका;मंत्री सामंतांची तत्परता

rescue operation leopard rescued Incident at Newre kokan ratnagiri marathi news
rescue operation leopard rescued Incident at Newre kokan ratnagiri marathi news

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याचा प्रकार काल सायंकाळी उघडकीस आला. विशेष म्हणजे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याची माहिती रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकार्‍यांना दिल्यानंतर ही कार्यवाही झाली. अडीच ते तीन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर फास कटरने कापून बिबट्याची सुखरूप सुटका केली. वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. 


वन विभागाने वारंवार आवाहन करूनही डुकराच्या शिकारीसाठी अजूनही ग्रामीण भागात फासकी लावली जात असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. काल सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सूमारास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना नेवर्‍यात बिबट्या फासकीत अडकल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वन विभागाच्या रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांना काॅल केला. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना घेऊन नेवरे येथे जाऊन खात्री केली. तर बिबट्या फसकीत अडकलेला दिसून आला. बिबट्याची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी पिंजरा लावून बिबट्याचा काही भाग पिंजर्‍यात गेल्यानंतर कटरच्या सहायाने फास कट करून बिबट्याची सुटका केली.

 नेवरे येथील घटना; वन विभागाचे यश

बिबट्यास पिंजर्‍यात घेऊन रत्नागिरी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी केली. बिबट्या सुस्थितीत असल्याचे खात्री झाल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी दीपक  पोपटराव खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, वनपाल पाली गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकदेवी म.ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले, सा. रं. पताडे यांनी यशस्वी केले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com