सभापतींना राजीनामे २५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश ; रत्नागिरीत इच्छुकांकडून पुढील निवडीसाठी फिल्डिंग

resign letter of meeters in ratnagiri till 25 february to members of zilla parishad
resign letter of meeters in ratnagiri till 25 february to members of zilla parishad
Updated on

रत्नागिरी : जिल्हा परिषदेसह शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटावर शिक्‍कामोर्तब झाले. विषय समिती सभापतींसह पंचायत समिती सभापतींचे राजीनामे २५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर करण्याचे आदेश शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून पुढील निवडीसाठी फिल्डिंग लावण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती पदावर सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. आतापर्यंत तीन टर्ममध्ये बहुतांश सदस्यांना संधी दिली गेली. पुढील वर्षाच्या सुरवातीला दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या वर्षभरासाठी संधी मिळावी म्हणून इच्छुक फिल्डिंग लावून होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्षपदी महेश नाटेकर, आरोग्य सभापतिपदी बाबू म्हाप, महिला व बालकल्याण सभापतिपदी 
रजनी चिंगळे; तर समाजकल्याण सभापतीपदी ऋतुजा जाधव यांची नियुक्‍ती झाली.

विकासकामे करण्याची संधीच या पदाधिकाऱ्यांना मिळाली नाही. शासनाने निधी कपातीचे धोरण स्वीकारल्यामुळे त्यात भर पडली. या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. दरम्यान, महिन्याभरापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी खांदेपालटाचे सुतोवाच केले. गुरुवारी (ता. ११) शासकीय विश्रामगृहात जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम यांच्यासह सर्व तालुक्‍यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

त्यानंतर पक्षादेशाप्रमाणे जि. प. विषय समिती सभापती, पं. स. सदस्य यांचे राजीनामे २५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. हे राजीनामे अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे द्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा २४ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतरच विषय समिती सभापती २५ फेब्रुवारीला राजीनामे देतील. पुढील १५ दिवसांनी नवीन पदांची निवड होऊ शकते.

महाविकास आघाडीचे काय?

राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे या निवडीत त्याचा प्रत्यय येणार की नाही याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. त्यातील सातजण आमदार जाधव यांच्याबरोबर मनाने शिवसेनेत आहेत. जाधव यांचे सुपुत्र विक्रांत यांचाही त्यात समावेश आहे. उर्वरित सहापैकी जिल्हा परिषदेत सभापतीपदाची लॉटरी कोणाला लागणार, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com