Ambolgad Tourism : 'या' सागरीमार्गामुळे आंबोळगडातील पर्यटनाला मिळणार चालना; व्यावसायिकांना होणार फायदा

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे.
Revas-Reddy Coastal Road
Revas-Reddy Coastal Roadesakal
Summary

शासनातर्फे रेवस-रेड्डी सागरीमार्ग (Revas-Reddy Sagarimarg) उभारण्यात येणार असून, हा मार्ग सागर किनारपट्टीवरील गावांमधून जाणार आहे.

राजापूर : कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा एक महामार्ग असावा, या दृष्टीने शासनातर्फे रेवस-रेड्डी सागरीमार्ग (कोस्टल रोड) उभारण्यात येणार आहे. या रस्त्यानजीकच्या पर्यटनाची ठिकाणे वा गावांच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने शासनातर्फे विकासकेंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामध्ये आंबोळगडचा (Ambolgad Tourism) समावेश आहे. या केंद्रामुळे निसर्गरम्य आणि स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेल्या आंबोळगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Revas-Reddy Coastal Road
Sheel Dam : रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात फक्त 25 टक्केच पाणी; पानवल धरणही गळतीमुळे बंद!

शासनातर्फे रेवस-रेड्डी सागरीमार्ग (Revas-Reddy Sagarimarg) उभारण्यात येणार असून, हा मार्ग सागर किनारपट्टीवरील गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्‍यांवरील गावे आणि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. सागरी मार्गावर पुलांची उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रेवस-रेड्डी सागरी मार्गाची उभारणी करताना या मार्गावरील पर्यटकांची पसंती मिळालेल्या गावांमध्ये विकासकेंद्र उभारून शासनातर्फे तेथील पर्यटनाला चालना दिली जात आहे.

Revas-Reddy Coastal Road
Revas-Reddy Coastal Road

त्यामध्ये सागरीमार्गावरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०५ गावांमधील १३ गावांमध्ये शासनातर्फे विकासकेंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम एमएसआरडीसीतर्फे हाती घेतले आहे.

Revas-Reddy Coastal Road
Panchganga River : पंचगंगा नदीत हजारो मृत माशांचा खच; घाटाला गटारगंगेचे स्वरूप, प्रशासनाचे नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष

या १३ विकासकेंद्रात आंबोळगड गावाचा समावेश आहे. या माध्यमातून आंबोळगडसह सागरी किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरवर्षी या किनाऱ्यावर हजारो पर्यटक भेट देतात. शांत आणि विस्तीर्ण किनारा पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे. भविष्यात सुधारणा झाल्यास आंबोळगडमध्ये स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.

Revas-Reddy Coastal Road
Radhanagari Dam : राधानगरी, काळम्मावाडी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; भोगावती, पंचगंगा तुडुंब

वैशिष्ट्यपूर्ण आंबोळगड परिसर

राजापूर तालुक्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर वसलेल्या आंबोळगड गावाला समुद्रकिनारा लाभलेला आहे. राजापूरमध्ये वाळूच्या किनाऱ्याची सर्वाधिक लांबी आंबोळगडला लाभलेली आहे. येथील विस्तीर्ण किनाऱ्यावरून फेरफटका मारण्याचा आनंद पर्यटकांसाठी अवर्णनीय असतो. या ठिकाणी मच्छीमारांची लगबगही जवळून अनुभवता येते. समुद्रकिनाऱ्‍यापासून सुमारे एक कि. मी. अंतरावर जांभ्या कातळाच्या पठारावर श्रीगगनगिरी स्वामींचा मठ आहे. आध्यात्मिक जोड मिळालेल्या या ठिकाणावर पर्यटकांचा राबता वाढण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. या परिसरामध्ये प्रसिद्ध वेत्ये बीच, कशेळी बीच, आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली देवीचे मंदिर, कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर अशी पर्यटनस्थळं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com