Good News : कोकणकर यंदा भातलागवडीत झाली वाढ, वाचा

rice crop increased in kokan the  is 21 percentage regular rain the main reason
rice crop increased in kokan the is 21 percentage regular rain the main reason

रत्नागिरी : जिल्ह्यात भात लागवडीखाली 21 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमिन आल्याने जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी दिली. भाताबरोबरच नाचणी पीक क्षेत्रामध्ये 11 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे चाकरमान्यांनी गावची वाट धरली. त्यामुळे जिल्ह्यात 69 हजार हेक्‍टरवर भातशेती होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला होता. 

दरवर्षी सरासरी 65 हजार हेक्‍टरवरती भातशेती केली जाते. यावर्षी या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. यंदा जुलै महिन्यामध्ये पाऊस मंदावला होता. पण ऑगस्टमध्ये पावसाने कसर भरून काढली. 21.19 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जमिनीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत भात लागवडीखाली क्षेत्र आले आहे. समाधानकारक पावसामुळेही भाताबरोबरच नाचणी पिकाच्या क्षेत्रामध्ये 11 टक्के वाढ झाली आहे.

समाधानकारक पावसामुळे भातशेतीही जोमाने आल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिकाला रोगाची लागण होण्याची शक्‍यता असते. पाऊस पडला नाही तर अनेकवेळा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. जर किडीचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात घट होण्याची शक्‍यता असते; मात्र सध्यातरी जिल्ह्यात पीक परिस्थिती समाधानकारक असल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com