१२० एकर भात शेतीचा फक्त पेंढाच हाताशी ; भातावर पीस रोगाचा परिणाम

on rice crop the pic infect crop in konkan 120 acre rice crop cutting off in next week
on rice crop the pic infect crop in konkan 120 acre rice crop cutting off in next week

चिपळूण : तालुक्‍यातील मोरवणे बुद्रुक आणि परिसरातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाचे बियाणे वापरले; मात्र अवेळी झालेल्या पावसाने पीस रोगाचा मोठ्या प्रमाणात भात शेतीवर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे गावातील ५८ शेतकऱ्यांच्या सुमारे १२० एकर भात शेतीचा फक्त पेंढा हाती येणार आहे. आठवडाभरात तो कापावा लागणार आहे.

कापण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मोरवणे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी सभापती धनश्री शिंदे यांच्याकडे केली. मोरवणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज पंचायत समितीत सभापती धनश्री शिंदे यांची भेट घेतली. भात शेती नुकसानीचे निवेदन दिले. शेतकरी गणपतराव शिंदे म्हणाले, मोरवणे गावाची पंचायत समितीने सेंद्रिय गाव म्हणून गतवर्षी निवड केली होती. कृषीच्या सल्ल्यानुसार बहुतांशी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निवड केली.

भात पिकासाठी कृषी विद्यापीठाचे सर्व बियाणे वापरले आहे. भात भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पावसाचा जोर वाढला. परिणामी ‘पीस’ रोगाचा मोठ्या प्रमाणावर भातावर परिणाम झाला आहे. पुढील आढवड्यात भातकापणी होणार आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे भात भरलेले नाही. परिणामी पेंढा कापावा लागणार आहे.

कोरोनामुळे शेतकरीही संकटात आहे. त्यातच ९० टक्के भातशेतीचे उत्पादन मिळणार नसल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मोरवणे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. त्यावर प्रकाश शिंदे, विजय शिंदे, विनायक शिंदे, प्रमोद शिंदे, प्रकाश शिंदे, रविंद्र कदम, रामचंद्र शिंदे, दशरथ शिंदे, उदय शिंदे, अनिल शिंदे, राजेंद्र कदम आदींच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांनी विमा काढला असता

गावात दोन वेळा शेतीशाळा घेण्यात आली; मात्र कृषीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पीक विमा योजनेविषयी माहिती दिली नाही. शेतकऱ्यांना विमा योजनेची माहिती मिळाली असती तर शेतकऱ्यांनी विमा काढला असता. कृषी सहायक यांचेही गावाकडे लक्ष नाही. त्यामुळे भात पीक कापण्यासाठी अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी करावी. यातून भातशेतीची वस्तुस्थिती निदर्शनास येईल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 


संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com