चोरगेंच्या संस्थेत राईस हार्वेस्टर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

रत्नागिरी - यांत्रिकीकरणाची गरज लक्षात घेऊन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेने ‘कंबाईन राईस हार्वेस्टर’ मशिन पंजाबहून आणले आहे. यापूर्वी संस्थेने भात कापणी यंत्र (रिपर), भात मळणी यंत्र (पॅडी श्रेशर), भात लावणी यंत्र (राईस ट्रान्सप्लांटर), भात शेतीसाठी चिखलणी यंत्र (पडलर) अशी यंत्र सामुग्री आणली आहे.

संपूर्ण कोकणातील हे पहिले मशीन आहे. त्यामध्ये भातकापणी व मळणी एकदम होऊन भात स्टोअर टॅंकमध्ये गोळा होते. वीस मण (८ क्विंटल) भात गोळा करण्याची क्षमता आहे. ते भात टॅंक्‍टर ट्रॉलीने किंवा पाईपच्या साह्याने बाहेर ओतले जाते. त्यासाठी सहा लिटर डिझेल लागते. एका तासाला दीड एकर भात कापून मळून बाहेर टाकले जाते. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अर्थ साह्याने ते मशिन संस्थेने उपलब्ध केले आहे. प्रत्येक गावात आठ ते दहा लोकांनी एकत्र येवून अशा प्रकारचा कंबाईन हार्वेस्टर घेतला.  

मशिनचा आरंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते झाला. आरडीसीसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक जीवन गांगण, ए. बी. चव्हाण, रावसाहेब सुर्वे, मानसिंग महाडिक, मनोहर महाडिक, सुरेश खापले, निखिल चोरगे, प्राचार्य आर. टी. जाधव, डॉ. सलील मोडक, डॉ. संकेत कदम उपस्थित होते.

दिवसाला आठ ते दहा एकरवर काम
या मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे याला चालण्याकरता लोखंडी चैन नसून रबरी चैन आहे. त्यामुळे हे मशिन डांबरी रस्त्यावरून कोठेही नेता येते. मशिनची कापणी यंत्राची रुंदी ६ फुट असल्याने कोकणातील लहान खाचरातही हे मशिन चालू शकते. दिवसाकाठी आठ ते दहा एकर भातशेती कापून भात घरी आणता येते.

Web Title: rice harvester in Tanaji Chorge Institute