लाॅकडाऊनची एैसी की तैसी म्हणत नागरीक बाजारात अन्....

The risk of becoming unsafe in Mandangad kokan marathi news
The risk of becoming unsafe in Mandangad kokan marathi news
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : देशभरात कोरोना तिसऱ्या टप्यात प्रवेश करत असून अनेक गावे व शहरातून कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन कडक करण्यात आले असताना मंडणगडात मात्र लाॅकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून नागरीक बाजारात गर्दी करत आहेत. सोशल डिस्टंन्स ठेवा विनाकारण फिरू नका, घरातच थांबा, दुचाकी व चारचाकी वाहने फिरवू नका असे नगरपंचायत व पोलीस प्रशासनकडून वारंवार आव्हान केले जात आहे. मात्र अनेकजण नियम धाब्यावर बसवून लाॅकडाऊनची एैसी की तैसी करत असल्याचे चित्र तीन दिवसांपासून मंडणगड शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रार्दूभावात सुरक्षीत असलेले मंडणगड शहर आणि तालुका असूरक्षीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


जीवनावश्यक वस्तूं खरेदीच्या नावाखाली गर्दी करणाऱ्यांना कडक कारवाईने अटकाव करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. मुख्याधिकारी संतोष माळी व पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी केलेल्या उपाययोजना, कायदा व सुव्यवस्था आमंलात आणल्या. मागील दोन दिवसांपासून गर्दीवर नियंत्रण झालेले नाही. त्यामुळे आता तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी योग्य पद्धतीने नियोजन करून तालुका सुरक्षीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. किराणा, दूध, भाजी, सुकी मासळी, चिकन, मटण, औषधे यांसारख्या जिवनावश्यक सुविधा मिळाव्या म्हणून बाजारपेठेत यासर्वप्रकारची दुकाने सुरू ठेवली जात आहेत. मात्र शहरासह ग्रामिण भागातील अनेक नागरीक सकाळी व सायंकाळी बाजारात गर्दी करीत आहेत.

पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना सोशल डिस्टंन्सचे नियम पाळा असे वारंवार सांगूनही काही व्यापाऱ्यांकडून हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या गर्दी बाबत संमंधीत दुकानदारांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. काही दुचाकी व चारचाकी वाहन चालक विनाकारण बिंदास्तपणे शहरात फिरत आहेत. पोलीसांच्या कडक कारवाईमुळे हे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता पोलीसांनी याबाबत थोडीशी नरमाई दाखवल्यामुळे दोन दिवसात शहरातील गर्दीचे प्रमाणे वाढले आहे. आरोग्य विभागाने अनेकांना होम कोरंटाईन केले.

तालुक्यात कोणीही अद्याप कोरोनोबाधीत सापडले नाही. त्यामुळे सुरक्षीत शहर आणि तालुका अशी आतापर्यंत ओळख झाली आहे. ते तसेच रहावे यासाठी नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना आळा घालणे गरजेचे असून नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील जागृक नागरीकांकडून होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com