esakal | नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

river

नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली : देवरुख जवळ पूर गावी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाला आहे, तर यातील एक तरुण बेपत्ता असून एका तरुणाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजिकच्या पूर झेपलेवाडी येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे.

गणेशोत्सवासाठी पूर-झेपलेवाडी येथील काही चाकरमानी गावाकडे आले आहेत. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काही चाकरमानी व गावातील स्थानिक तरुण असे सुमारे दहाजण सप्तलिंगी नदीपात्रातील जांभळीचे उतरण या ठिकाणी पोहोण्यासाठी गेले होते. गेली चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सप्तलिंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. दहा तरुणांपैकी तिघेजणानी प्रथम पोहण्यासाठी नदीपात्रात झेप घेतली, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब नदीकिनारी असणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

हेही वाचा: पुण्यातील 'त्या' मुलीवर ठाण्यात आणखी एका तरुणाकडून अत्याचार

यातील अशोक सोनू झेपले (५०) व हर्ष संजय घाटकर (१५) यांना वाचवण्यात यश आले आहे. हा प्रकार ग्रामस्थांना समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अशोक झेपले व हर्षद घाटकर यांना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी केल्यानंतर येथील अशोक झेपले यांना मृत घोषित करण्यात आले, तर हर्ष घाटकर याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष सडकर, किशोर जोयशी, जावेद तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. पोहण्यासाठी गेलेल्यांपैकी संजय सिताराम घाटकर हे बेपत्ता झाले असून ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत. शोध मोहिमेत ग्रामस्थां बरोबरच राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे सदस्य व पोहण्यात तरबेज असणिर्‍यांनी शोध मोहिम सुरु ठेवली होती. अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत

loading image
go to top