esakal | पुण्यातील 'त्या' मुलीवर ठाण्यात आणखी एका तरुणाकडून अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

पुण्यातील 'त्या' मुलीवर ठाण्यात आणखी एका तरुणाकडून अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर एकूण 14 जणांनी बलात्कार केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. संबंधित मुलगी पुणे स्टेशनवरून रेल्वेने दादर येथे उतरल्यानंतर ठाण्यातील एका 32 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी आरोपीस वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. राजेश शांताराम कुंभार (वय 32, रा. शांताबाई चाळ, कोपरी, ठाणे पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एकुण 17 आरोपींविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी भारती शेवाळे

संबंधित 14 वर्षीय मुलगी 31 ऑगस्ट रोजी तिच्या एका मित्रास भेटण्याकरिता घरी कोणास काही न सांगता पुणे रेल्वे स्टेशनवर गेली होती. परंतु, रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो असे सांगत एका रिक्षाचालकाने तिला वानवडी येथे नेऊन तिच्यावर साथीदारांसह बलात्कार केला. दोन दिवसात एकूण 13 जणांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली. तसेच मुलीचा मुंबईतील मित्र आणि दोन लॉज मालक यांनाही पोलिसांनी अटक केली.

आरोपी हा ठाणे येथे नेमका कोठे घेवून गेला. त्याला कोणी मदत केली आहे का? त्याचा मोबाईल जप्त करण्यासाठी तसेच पुरावे जमा करण्यासाठी त्याला 10 दिवसाची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केली. न्यायालयाने त्याला 20 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मदत करण्याच्या बहाण्याने नेले घरी आणि :

संबंधित मुलगी पुण्याहून दादर रेल्वे स्टेशन येथे जाउन प्लॅटफॉर्मवर तिच्या मित्राची वाट पाहत बसली होती. त्यावेळी कुंभार याने तीला वेफर्स, ज्युस आणि पाण्याची बाटली घेवून दिली. त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने तिला ठाणे येथील घरी घेवून गेला. त्यानंतर त्याने तीच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केले असून आरोपी राजेश याने गुन्हा कबूल केला आहे.

या गुन्ह्यात संबंधित मुलीने तक्रार देण्याच्या आधीच पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आहे. अशा प्रकारचे गुन्हे होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने शहरातील सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक ती सर्व उपाययोजन सुरू केली आहे. तसेच दररोजचे पोलिस पेट्रोलिंग देखील वाढवले आहे. या गुन्ह्याचा तपास अत्यंत योग्य दिशेने सुरू असून आत्तापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

loading image
go to top