Road Accident : चिपळूण-कराड महामार्गावरुन प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..

चिपळूण-कराड हायवेमुळे (Chiplun-Karad Highway) गेले काही दिवस अपघाताची मालिका सुरू आहे.
Chiplun-Karad Highway
Chiplun-Karad Highwayesakal
Summary

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी स्पीडब्रेकरची व्यवस्था करावी व होत असलेले हकनाक बळी थांबवावेत.

चिपळूण : खेर्डीतील चिपळूण-कराड हायवेमुळे (Chiplun-Karad Highway) गेले काही दिवस अपघाताची मालिका सुरू आहे. यामुळे या भागात अनेक अपघात (Road Accident) होत असून, काहींचे बळीदेखील गेले आहेत. संबंधित ठेकेदाराने या मार्गावर आवश्यक ते सूचनाफलक तसेच पांढरे पट्टेदेखील मारलेले नाहीत.

त्यामुळे खेर्डीतील रस्ता जीवघेणा ठरला आहे. याबाबत खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर व माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी राष्ट्रीय महामार्गाला निवेदन दिले. यामध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशी मागणी केली.

Chiplun-Karad Highway
Karnataka : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 'हे' 36 काँग्रेस नेते अडचणीत; कोर्टानं बजावलं समन्स

दशरथ दाभोळकर, ठसाळे तसेच ठाकरे गट युवासेनेचे उमेश खताते यांनीही निवेदन दिले आहे. खेर्डीमध्ये काही ठिकाणी स्पीडब्रेकरची मागणी या निवेदनातून केली आहे. खेर्डीतील वाढते अपघात व जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी स्पीडब्रेकरची फार मोठी आवश्यकता आहे.

Chiplun-Karad Highway
Maharashtra Politics : मोठ्या राजकीय पक्षांना KCR घाम फोडणार; चंद्रशेखर राव यांना हवेत नऊ माजी आमदार!

या रस्त्यावर वेगाची मर्यादा नसल्यामुळे व खेर्डीतील वाढती रहदारी व झपाट्याने होणारी लोकसंख्यावाढ यामुळे येथे एक पोलिस असावा, अशी मागणी दाभोळकर यांनी प्रशासनाला केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी स्पीडब्रेकरची व्यवस्था करावी व होत असलेले हकनाक बळी थांबवावेत, अशी विनंतीवजा सूचना त्यांनी केली आहे.

Chiplun-Karad Highway
Kolhapur Riots : सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी दंगली घडवत आहे; जयंत पाटलांना वेगळाच संशय

दोन दिवसांपूर्वीच खेर्डी बाजारपेठेमध्ये एका व्यक्तीचा हकनाक बळी गेला आहे तर २० दिवसांपूर्वी खेर्डी दत्तमंदिर येथे झालेल्या अपघातात एका मुलीस गंभीर दुखापत झाली होती. अजूनही तिच्यावर उपचार सुरू आहेत. याची दखल प्रशासनाने न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दशरथ दाभोळकर यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com