पुनाडेवाडी आणि पाचाड च्या दरम्यानचा रस्ता खचला

अमित गवळे 
रविवार, 24 जून 2018

पाली : शिवराज्याभिषेक दिन (तिथीनुसार)सोमवारी (ता.२५) आहे. जे शिवप्रेमी रायगडावर निजामपुर - पाचाड मार्गे जाणार आहेत त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण पुनाडेवाडी ते पाचाडच्या दरम्यान असलेला रस्त्याची एक बाजू खचली आहे.

दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य रविवारी (ता.२४) रायगड वरून या मार्गे परतत असतांना त्यांना हा खचलेला रस्ता दिसला. दुर्गवीरच्या सदस्यांनी ताबडतोब प्रसंगावधानता दाखवून खबरदारीचा इशारा देण्यासाठी तीथे भगवा कपडा लावला आहे. या भागातून जातांना काळजी घेऊन वाहने चालवावीत असे आवाहन दुर्गवीरचे सदस्य धिरज लोके यांनी सकाळच्या माध्यमातून केले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुकर, संस्कृती हसुरकर, सागर टक्के, योगेश गवाणकर, सचिन रेडेकर, धिरज लोके रामजी कदम व समीर शिंदे आदी दुर्गवीरांनी प्रसंगावधानता दाखविली आहे.

या मार्गावरून रायगडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांनी काळजी घेण आवश्यक आहे. येथून एकावेळी एकच चार चाकी जावू शकते. मोठी गाडी आल्यावर त्याच्या बाजुने दुसरी गाडी गेल्यास अपघात होण्याचा धोका आहे.
 
Web Title: The road between Punaidewadi and Pachad was lost