पाली पोलिसांनी दिले वाहनचालकांना रस्ता सुरक्षेचे धडे

अमित गवळे
रविवार, 29 एप्रिल 2018

गाडीचा वे नियंत्रित ठेवा, धोक्याच्या वळणावर वेग कमी करा व आपल्याच बाजूने गाडी सावकाश हाका, विनाकारण हॉर्न वाजवू नका, समोरून गाडी येत नसेल तरच ओव्हरटेक करा अशा अनेक सूचना यावेळी रोडवर उभे राहून चालकांना पाली पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या.

पाली - रायगड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल चे मालक नोएल चिंचोलकर होते. यावेळी पाली पोलिसांनी चालकांना रस्ता सुरक्षा नियमांची माहिती देवून मार्गदर्शन केले.
       
दुचाकी वापरतांना हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे याचे भान ठेवा, कंटाळा करू नका, परवाना सोबत आवश्यक आहे , वेगाने वाहन न चालविता सावकाश निघा व सुरक्षित घरी पोहोचा असा संदेश यावेळी दुचाकी वाहन धारकांना देण्यात आला. वाहन चालवितांना स्वतःची व समोरील वाहन व व्यक्तीची सुरक्षा महत्वाची आहेच पण त्याच बरोबर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे हे सुद्धा चालकाचे कर्तव्य आहे असे आयोजक शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल चे मालक नोएल चिंचोलकर यांनी सांगितले.
     
यावेळी छोटी वाहने आणि अवजड वाहन चालकांना नियमांचे पत्रक वाचण्यासाठी दिले. छोटी वाहने चालवितांना चालक आणि बाजूच्या व्यक्तीने सक्तीने सुरक्षा बेल्ट लावा, सोबत गाडी संबंधी आवश्यक असणारे कागदपत्रे आणि परवाना आवश्यक आहे, गाडीचा वे नियंत्रित ठेवा, धोक्याच्या वळणावर वेग कमी करा व आपल्याच बाजूने गाडी सावकाश हाका, विनाकारण हॉर्न वाजवू नका, समोरून गाडी येत नसेल तरच ओव्हरटेक करा अशा अनेक सूचना यावेळी रोडवर उभे राहून चालकांना पाली पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या.
     
पाली शहरात आणि महामार्गावर शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल च्या वतीने रस्ता सुरक्षा च्या आयोजनात वाहन चालकांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात महामार्गावर फ्लेक्स लावण्यात आले होते. यावेळी  बोलतांना चिंचोलकर म्हणाले कि सुरक्षित वाहन चालविणे आणि नियमांची माहिती असणे यासाठी लागणारी कुशलता चालकांना ट्रेनिंग स्कूल मध्ये नक्की मिळते यासाठी तरुण पिढीने ट्रेनिंग स्कूल मध्ये आपले वाहन शिकण्याचे शिक्षण पूर्ण करावे. 
   
रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतांना पाली पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार विजय चव्हाण, आत्माराम पाटील, प्रफुल्ल चांदोरकर , पो.ना.अमोल म्हात्रे, पो.शि. विनोद पाटील तसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजक शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल चे मालक नोएल चिंचोलकर आणि अमित गुजर आदि उपस्थित होते.

जनजागृतीसाठी माहिती पत्रकांचे वाटप
वाहने चालविणाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन हे स्वत:च्या मनापासून करावे, कुणी तरी पालन करायला सांगतो म्हणून नव्हे तर लोकांनी रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे. देशात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जखमी होण्याचेही प्रमाण जास्त आहे. यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. यादृष्टीने प्रयत्न केल्यास रस्ते अपघात निश्चित कमी होतील, यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने नागोठणे आणि पाली येथील वृत्तपत्रातून माहितीपत्रके देण्यात आली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Road safety lessons provided by Pali Police