मालवणमध्ये सरपंचांच्या घरीच घरफोडी

thief
thief

मालवण : तिरवडे गावचे सरपंच विहंग वासुदेव गावडे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. तालुक्यात गेल्या आठवडाभरात झालेली तिसरी घरफोडी असून अज्ञात चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

तिरवडे येथील सरपंच विहंग गावडे कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे घर ३१ ऑक्टोबर ते आजपर्यंत बंदावस्थेत होते. आज सकाळी गावडे हे घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटून टाकलेला दिसला. त्यांनी घरात जात पाहणी केली असता बेडरूमच्या बेडखाली ठेवलेल्या डब्यातील १२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख अडीच हजार रुपये अशी रक्कम गायब असल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती कट्टा पोलिस दुरक्षेत्राच्या पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, रुक्मांगत मुंडे, स्वप्नील तांबे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तालुक्यातील कातवड, पेंडूर सोनारवाडी यानंतर आता तिरवडे येथे घरफोडीची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com