
Weather Warnings
esakal
थोडक्यात :
देवगडजवळ दुर्घटना – ‘त्रिवेणी’ ही मच्छीमारी नौका कळाशी समुद्र परिसरात वादळी वारे व लाटांच्या तडाख्यात सापडून गुरुवारी (ता. १८) रात्री साडेसातच्या सुमारास बुडाली.
सहा मच्छीमारांचे प्राण वाचले – नौकेवरील तांडेल बसप्पा कुरे यांनी वायरलेसने संपर्क साधल्याने जवळील ‘देवयानी’ नौकेवरील मच्छीमारांनी सहा मच्छीमारांना दोरीच्या सहायाने सुरक्षित आपल्या नौकेवर घेतले.
मोठे आर्थिक नुकसान – नौका आणि त्यावरील साहित्य पूर्णपणे बुडाल्याने मालक राजेंद्र भिल्लारे यांचे सुमारे २०–२५ लाखांचे नुकसान झाले; मत्स्यव्यवसाय विभागाने पंचनामा केला.
Boat Sinking Near Devgad : समुद्रातील खराब हवामानामुळे येथील बंदरात परतणारी ‘त्रिवेणी’ ही मच्छीमारी नौका वादळी वाऱ्यामुळे लाटांच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून नौकेवरील सर्व सहा मच्छीमारांना अन्य एका नौकेवरील मच्छीमारांनी सुखरूप आपल्या नौकेवर घेतल्याने ते बचावले. ही घटना गुरुवारी (ता. १८) रात्री साडेसातच्या सुमारास तालुक्यातील कळाशी समुद्र परिसरात घडली. यामध्ये नौकामालक राजेंद्र बाळकृष्ण भिल्लारे (रा. देवगड) यांचे सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाले.