परबांची ओळख सावंतवाडी मर्यादितच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

सावंतवाडी - विधानसभा निवडणुका लढविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संजू परब यांची ओळख सावंतवाडी पुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांनी आधी वेंगुर्ले, दोडामार्गमध्ये आपली ओळख करा आणि नंतर केसरकरांना पराभूत करण्याच्या गोष्टी कराव्यात. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.

मडुरा सरपंच निवडीनंतर काल (ता. २६) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी राऊळ, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. माजी सभापती चंद्रकांत कासार उपस्थित होते. 

राऊळ म्हणाले, ‘‘मडुरा येथे परब यांना मिळालेला विजय पैशाचा पाऊस पाडल्यामुळेच आहे. आम्ही त्याठिकाणी आमची ताकद किंवा प्रतिष्ठा दाखविण्यासाठी गेलो नव्हतो तर पक्षाच्या आदेशानुसार काम करायचे होते. त्याठिकाणी शिवसेना भाजपा युती व्हावी म्हणून स्थानिक कार्यकर्त्यानी इच्छा व्यक्त केल्याने युतीचा निर्णय घेतला होता. असे असताना दहशत व पैश्‍याच्या जोरावर परब यांनी यश मिळविले.’’

केसरकरांवर बोलण्याचे राजकीय वय नाही 
राऊळ म्हणाले, ‘‘परब हे उठसूट आमच्या पालकमंत्र्यांवर बोलत आहेत; मात्र त्याचे काम आणि राज्यमंत्री म्हणून राज्याप्रती असलेली तळमळ लक्षात घेता परब यांचे राजकीय वय नाही. त्यामुळे केवळ नेत्यांना खूश करण्यासाठी त्यांनी असे विधान करणे चुकीचे आहे.’’

Web Title: Rupesh Raul comment