सागासह 3 लाख 70 हजारांचे लाकूड जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मंडणगड - मंडणगड येथील वन विभागाने कुंबळे व शेनाळे येथे केलेल्या कारवाईत सागाच्या लाकडांसह एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या संदर्भात वनरक्षक उदय भागवत यांनी माहिती दिली. तालुक्‍यात आठवडाभरात आढळलेला हा दुसरा अवैध साठा आहे.

मंडणगड - मंडणगड येथील वन विभागाने कुंबळे व शेनाळे येथे केलेल्या कारवाईत सागाच्या लाकडांसह एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या संदर्भात वनरक्षक उदय भागवत यांनी माहिती दिली. तालुक्‍यात आठवडाभरात आढळलेला हा दुसरा अवैध साठा आहे.

वन विभागाने शनिवारी (ता. 11) कुंबळे येथे केलेल्या कारवाईत अशोक जाधव यांच्या घराच्या परिसरात 32.732 घनमीटर विनापरवाना जळाऊ लाकडे व इमारतींसाठी लागणाऱ्या लाकडांचा साठा आढळून आला.

यामध्ये 121 घनमीटर जळाऊ लाकडे, तर आंबा, साग, जांभूळ, बिवळा, असे एकूण 110 नग आढळून आले. जागामालक अशोक जाधव यांच्याकडे संबंधित लाकडे तोडण्याचा अथवा वाहतूक करण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे शासकीय दराप्रमाणे जाधव यांच्याकडे 2 लाख 10 हजार 238 रुपये किमतीचा अनधिकृत लाकूडसाठा आढळून आला आहे. याचबरोबर मंगळवारी वनरक्षक उदय भागवत व ढाकणे यांनी शेनाळे येथील अशोक दळवी यांच्या मालकीच्या लाकडाच्या गिरणीवर केलेल्या कारवाईत 30 घनमीटर आकारमानाचे सागाचे 500 नग आढळून आले. वन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील कागदपत्रांची चौकशी केली असता लाकूड व्यावसायिक आदेश केणे यांनी 163 नग (10.788 घनमीटर) सागाच्या तोडीचे व वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे परवाने उपलब्ध नसल्याचे सांगितले. यामुळे शेनाळे येथील लाकूड गिरणीत विनापरवाना विनापास आढळलेले 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे सागाचे लाकूड वन विभागाने जप्त केले. वनअधिनय 1927 चे कलम 41 2(ब) प्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वन विभागाच्या माध्यमातून पुढील कारवाई होत आहे. या संदर्भात वन विभागाकडे संबंधितांविरोधात कोणती कार्यवाही होणार, याची विचारणा केली असता दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

वन विभागाचे भय संपले
विनापरवाना लाकूडतोडीविरोधात वन विभागाने चार दिवसांत केलेल्या कारवाईत सुमारे 15 लाखांचा अवैध लाकूडसाठा वन विभागाने ताब्यात घेतल्याने वन विभागाचे लाकूड व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे भय शिल्लक नसल्याचा निष्कर्ष निघतो. वन विभागाचा अनधिकृत लाकूडतोडीवर अंकुश राहिलेला नाही, हेच यावरून सिद्ध होते.

Web Title: sag wood seized

टॅग्स