esakal | Konkan - सागर बंगल्यासाठी अडीच कोटी : उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

'सागर' बंगल्यासाठी अडीच कोटी : उदय सामंत

सीआरझेडची जर परवानगी मिळाली तर याठिकाणी लिफ्टची सुविधा करू

'सागर' बंगल्यासाठी अडीच कोटी : उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले : वेंगुर्ले पालिका ही पर्यटनातून सक्षम व्हावी, या उद्देशाने माजी पालकमंत्री दीपक केसरकर व मी अनेक कामांना निधी दिला. वेंगुर्लेच्या पर्यटनामध्ये भर घालणारा व वेंगुर्लेची शान असलेला सागर बंगला बांधण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याठिकाणी सीआरझेडची जर परवानगी मिळाली तर याठिकाणी लिफ्टची सुविधा करू. त्यामुळे वेंगुर्ले शहराला पुढील काळात जास्तीत जास्त निधी देण्याचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

हेही वाचा: शिवलीला पाटीलच्या किर्तनाचे आयोजन आले अंगलट, गुन्हा दाखल

पालकमंत्री सामंत व आमदार केसरकर यांनी दिलेल्या निधीमधून वेंगुर्ले सीमेवर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी, कॅम्प येथे नव्याने साकारण्यात आलेला कविवर्य मंगेश पाडगावकर बालोद्यान, ‘नाना- नानी पार्क’च्या धर्तीवर मानसिश्वर मंदिर नजीक साकारण्यात आलेल्या मानसिश्वर उद्यान व वेंगुर्ले सागर बंगला ते दीपगृहपर्यंत जाणाऱ्या सुशोभीकरण केलेल्या पादचारी मार्ग या कामांचे लोकार्पण पालकमंत्री सामंत व आमदार केसरकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे, नगरसेवक प्रशांत आपटे, विधाता सावंत, धर्मराज कांबळी, दादा सोकटे, अस्मिता राऊळ, कृतिका कुबल, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा गिरप- मोंडकर, पूनम जाधव, स्नेहल खोबरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, निलेश चमणकर, सुनील नांदोस्कर, आर्किटेक इंजिनीअर अमित कामत उपस्थित होते.

बॅ नाथ पै यांचे लवकरच स्मारक

चालू वर्ष हे बॅ नाथ पै यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यांच्या या जन्मभूमीत त्यांचे एक स्मारक उभे राहावे अशी वेंगुर्लावासीयांच्या मागणी होती. येत्या काही दिवसांत त्यासाठी १ कोटी रुपये मंजूर केले जातील. पुढच्या पिढीच्या विद्वत्तेत भर पडेल व बॅ नाथ पै यांचे काम या संपूर्ण कोकणात कसे होते हे लोकांना कळेल असे अभ्यासिकेतून निर्माण होणारे सुसज्ज स्मारक आम्ही पुढील काळात उभारणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले.

हेही वाचा: Dream 11 अ‍ॅप गोत्यात, गुन्हा दाखल; जाणून घ्या काय घडलं?

loading image
go to top