`सकाळ` रिलीफ फंडासाठी पाणदरे यांच्याकडून 50 हजार 

sakal relief fund Help banda sindhudurg
sakal relief fund Help banda sindhudurg

बांदा (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'ग्रस्तांच्या मदतीसाठी येथील निवृत्त प्राध्यापक तथा येथील नट वाचनालयाचे संचालक प्रकाश रघुनाथ पाणदरे यांनी "सकाळ रिलीफ फंडा'साठी 50 हजार रुपयांचा धनादेश "सकाळ'चे येथील बातमीदार नीलेश मोरजकर यांच्याकडे सुपूर्द केला. यापूर्वीही पाणदरे यांनी केरळमध्ये उद्‌भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी 25 हजारांची मदत "सकाळ रिलीफ फंडा'कडे दिली होती. 

"कोरोना'ने भारतासह जगातील लाखो लोक बाधित झाले आहेत. आतापर्यंत हजारो लोकांचे बळी गेले आहेत. देशातील सर्वाधिक "कोरोनाग्रस्त' महाराष्ट्रात आहेत. नैसर्गिक व जैविक आपत्तीत नेहमीच धावून जाणाऱ्या "सकाळ रिलीफ फंडा'ने स्वतःची 25 लाख रुपये मदत यासाठी दिली आहे. यासाठी "सकाळ माध्यम समूहा'तर्फे मदतीचे आवाहनही केले होते. या आवाहनाला दात्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

येथील प्रकाश पाणदरे हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. येथील शैक्षणिक, साहित्य, आरोग्यविषयक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. "कोरोना'ची जैविक आपत्ती ही दुर्दैवी असून, बाधित बांधव हे आपलेच असल्याच्या भावनेतून मदत दिल्याचे पाणदरे यांनी स्पष्ट केले. "सकाळ माध्यम समूहा'ने मदतीसाठी रिलीफ फंड उभारला, हे खरोखरच कौतुकास्पद असून, दात्यांनी यासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. "सकाळ'चे प्रतिनिधी मोरजकर यांनी आभार मानले. 

कोरोना'चे देशव्यापी संकट हे खूप मोठे आहे. या संकटाशी लढण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविणे महत्त्वाचे आहे. या लढाईत खारीचा वाटा असावा व आपल्या हातूनही रुग्णसेवा व्हावी, या भावनेने मदत केली आहे. 
- प्रकाश पाणदरे, संचालक, नट वाचनालय, बांदा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com