Maharashtra Day Special : लाठ्या झेलल्या, अश्रूधूर सोसले; पण मुंबईसाठी लढलो : दत्ताराम कोळवणकर; संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या आठवणी

स्वातंत्र्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या लक्षात राहिलेला लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. मुंबईचा ऐतिहासिक मोर्चा आणि त्या मोर्चात सहभागी झालेले आंदोलक म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील दत्ताराम कोळवणकर.
Dattaram Kolvankar, one of the brave participants of the Samyukta Maharashtra Movement, shares emotional memories of the 1960 struggle to keep Mumbai in Maharashtra.
Dattaram Kolvankar, one of the brave participants of the Samyukta Maharashtra Movement, shares emotional memories of the 1960 struggle to keep Mumbai in Maharashtra.Sakal
Updated on

अमित पंडित


साखरपा : स्वातंत्र्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या लक्षात राहिलेला लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. १०५ हुतात्मे झालेला तो लढा. त्याची सुरवात झालेला मुंबईचा ऐतिहासिक मोर्चा आणि त्या मोर्चात सहभागी झालेले आंदोलक म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील दत्ताराम कोळवणकर. त्यांनी त्या आंदोलनाच्या आठवणी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जागवल्या.
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे मुंबई महाराष्ट्रात सहभागी करून घेण्यासाठी झालेले स्वातंत्र्योत्तर आंदोलन. त्या आंदोलनाच्यावेळी कोळवणकर नोकरीनिमित्त मुंबईतील गिरगाव येथे वास्तव्यास होते. आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रातून राज्यभर मराठी लोकांमध्ये हा प्रश्न पोचवला तर होताच; पण त्यांच्या लेखांनी अनेक तरुणांबरोबरच कोळवणकर हेही प्रभावित झाले होते.

त्याचबरोबर मधू दंडवते, एस. एम. जोशी, प्रमिला दंडवते, मृणाल गोरे यांच्याही वक्तृत्वाचा प्रभाव त्या वेळी तरुणांवर होता. त्यामुळेच कोळवणकर यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईला निघालेल्या मोर्चात कोळवणकर हे सहभागी झाले होते. मोर्चा फोर्ट परिसरातील फ्लोरा फाउंटन परिसरात आला असता मोर्चावर पोलिसांनी आधी लाठी हल्ला केला. त्यात काहीजण जखमी झाले. अश्रूधुराचाही वापर पोलिसांनी केला; पण मोर्चातील कोणीही माघार घेत नाहीत, ही परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिसांनी गोळीबार केला.

हा गोळीबार समोरून पाहिल्याचे कोळवणकर सांगतात. आपल्या डोळ्यांदेखत मोर्चातील ८० सहकारी गोळ्या लागून हुतात्मा झालेल्या आठवणी कोळवणकरांनी सांगितल्या. मुंबई संयुक्त महाराष्ट्रात आणण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांनी हे बलिदान दिल्याचे त्यांनी स्वत: पाहिले. त्यानंतर या लढ्यात आणखी काही हुतात्मा झाले आणि तो आकडा १०५ झाला. त्या काळी मुंबईचे मुख्यमंत्री असलेले मोरारजी देसाई आणि स. का. पाटील यांच्या विरोधात जनतेत प्रचंड राग होता, हे कोळवणकर स्पष्टपणे सांगतात.

दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर झालेल्या अत्र्यांच्या सभेलाही कोळवणकर उपस्थित होते. त्या सभेत दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढण्याचे नियोजन झाले. गिरगावात कोळवणकर राहात होते. त्या परिसरातील ४० युवक त्या मोर्चाला जाणार असे ठरले. कोळवणकर अर्थातच त्यांच्याबरोबर जाणार होते. मुंबईच्या मोर्चाचा अनुभव असताना दिल्लीला जाण्यात धोका होता. तरी तो पत्करून कोळवणकर त्यांच्या साथीदारांसह दिल्लीला पोचले; पण दिल्लीचा मोर्चा शांततेत पार पडला. संसदेत मोर्चाचे निवेदन दिले. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रात असलेले सी. डी. देशमुख यांनी राजीनामा दिल्याची आठवणही कोळवणकर यांनी सांगितली.

डोळ्यांसमोर गोळीबार होताना पाहिला. ८० आंदोलनकर्ते डोळ्यांसमोर हुतात्मा होताना पाहिले. तरीही दिल्लीच्याही आंदोलनात सहभागी झालो. अखेर महाराष्ट्रात मुंबई मिळवूनच आंदोलन थांबवले. १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तो आनंदाचा दिवस होता.
- दत्ताराम कोळवणकर, आंदोलनकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com