रक्तचंदनाच्या तस्करीत स्थानिकांची टोळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

चिपळूण - चिपळूणमध्ये उघड झालेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमध्ये स्थानिकांची मोठी टोळी असल्याची शक्‍यता पोलिस आणि वन खाते तपासून पाहत आहे. याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे. शहरातील काही धनदांडगेही यामध्ये सामील आहेत का, याचीही शक्‍यता तपासून पाहिली जात आहे.

वन विभागाच्या पथकाने गोवळकोट आणि गुहागर बायपास येथे छापा घालून तब्बल नऊ कोटींचे रक्तचंदन जप्त केले. गोवळकोट रस्ता येथे पहिल्या दिवशी वन विभागाने एका दुकानाच्या गाळ्यातून रक्तचंदन जप्त केले होते. तो दुकान गाळा इसा हळदे यांनी भाड्याने घेतला असल्याची माहिती गाळ्याचे मालक दाभोळकर यांनी वन विभागाला दिली. त्यानुसार हळदे यांच्यावर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

कारवाईच्या भीतीने हळदे गायब आहे. गुहागर बायपास आणि गोवळकोट रस्ता येथे ज्या इमारतीच्या परिसरात हा साठा सापडला. त्या इमारतीचा जागा मालक आणि बिल्डर दोघांना चौकशीसाठी वन विभागाचे अधिकारी ताब्यात घेण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sandle wood smuggling local gang