प्रतिष्ठेच्या गटात शिवसेनेची कसोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

देवरूख - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, कॉंग्रेसने उमेदवारी यादी निश्‍चित केली असतानाच राष्ट्रवादीनेही त्यादृष्टीने निर्णायक पावले उचलली आहेत. या सर्व घडामोडीत प्रतिष्ठेच्या गटांमुळे शिवसेनेत उमेदवार निवडीची कसोटी लागल्याचे चित्र आहे. कसबा, कडवई आणि कोसुंब या बालेकिल्ल्यांमध्ये निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे शिवसेनेचे अन्य गटातील उमेदवार गॅसवर असल्याचे दिसत आहे. 
संगमेश्‍वर तालुक्‍यात सद्यःस्थितीत अस्तित्वात असणाऱ्या 8 पैकी 5 गटांवर शिवसेनेचे उमेदवार कार्यरत आहेत. 

यातील देवरूख हा कॉंग्रेसच्या ताब्यात असणारा गट नामशेष झाला आहे. परिणामी सेनेचे बालेकिल्ले तसेच राहिले आहेत; मात्र गटांच्या पुनर्रचनेचा फटका बालेकिल्ल्यांना बसला आहे. यामध्ये कसबा, कडवई आणि कोसुंब या गटांचा समावेश आहे. हे तिन्ही गट सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे मानले जातात. यामध्ये उमेदवार निवडीवरून पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. कडवईतून एकाच वेळी सेनेचे सहसंपर्क प्रमुख सहदेव बेटकर, माजी सभापती संतोष थेराडे, माजी जि. प. सभापती ऐश्‍वर्या घोसाळकर, माजी सभापती कृष्णा हरेकर अशी एकापेक्षा एक तगडी मंडळी मैदानात उतरली आहेत. आमदार सदानंद चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा गट हा जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांचा बालेकिल्ला आहे. येथून माजी जि.प. अध्यक्ष सौ. रचना महाडिक आणि माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश मुकादम दावेदार आहेत. या गटात महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोसुंब गटातून रोहन सुभाष बने, विद्यमान उपसभापती प्रमोद अधटराव, माजी समाजकल्याण सभापती प्रमोद कदम, माजी जि.प. सदस्य भाई दळवी, विद्यमान उपतालुकाप्रमुख शैलेश जाधव असे एकापेक्षा एक 12 जण रिंगणात उतरले आहेत. येथे आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या तीन गटांतील उमेदवारीचा परिणाम अन्य गटातील प्रस्थापित उमेदवारांवर होण्याची चिन्हे आहेत. 

उमेदवार निवडीच्या हालचाली 

निवडणुका जवळ येऊ लागल्याने भाजपने आपले अंतिम शिलेदार निवडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कॉंग्रेसने जवळपास प्रत्येक गटातील इच्छुक उमेदवारांची नावेच जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीनेही अंतिम निर्णय घेऊन उमेदवारी निश्‍चिती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

Web Title: sangameshwar taluka