सिंधुदुर्ग : सांगुळवाडीत घरावर कोसळली वीज 

सांगुळवाडी - मगामवाडी येथील पंढरीनाथ फाले यांच्या घरावर वीज कोसळून भिंतीला तडे गेले. 
सांगुळवाडी - मगामवाडी येथील पंढरीनाथ फाले यांच्या घरावर वीज कोसळून भिंतीला तडे गेले. 

वैभववाडी - सांगुळवाडी मगामवाडी येथील पंढरीनाथ बाबु फाले यांच्या घरावर वीज कोसळली. यामध्ये घरात असलेले पंढरीनाथ आणि त्यांचा तीन वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावले. वीजेमुळे घराच्या तीन भिंतीना तडे गेले असून जमीनीला भेगा पडल्या आहेत. घरातील इलेक्‍ट्रीक वस्तु जळाल्या. 

सोमवारी (ता.21) सायंकाळी तालुक्‍यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. याचवेळी सांगुळवाडी मगामवाडी येथे विजांच्या लखलखाटांनतंर कानठळ्या बसविणार आवाज झाला. ही वीज श्री. फाले यांच्या घरावर कोसळली. घराची भिंत तोडून वीज घरात घुसली. घरात पंढरीनाथ फाले आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेवून बसले होते. अचानक झालेल्या आवाजाने ते भयभीत झाले. काही कळायच्या आत घरातील इलेक्‍ट्रीक बोर्ड, वायरिंग, मेनस्वीच जळाले. याशिवाय दूरचित्रवाहिनी संचदेखील जळाला आहे. 

ज्या ठिकाणाहुन वीज घरात घुसली तेथे भिंतीला तडे गेले आहेत. भिंतीला एकुण तीन ठिकाणी तडे गेले आहेत. याशिवाय घराच्या चौथऱ्यालाही भेग गेली आहे. घरालगतच्या जमीनीला देखील तडा गेला आहे. या प्रकाराने कुटुंबीय भयभीत झाले आहे. 

शेतकरी चिंताग्रस्त 
दरम्यान आज (ता.22) सायंकाळी देखील तालुक्‍यात विजांच्या कडकडाटांसह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कापणी केलेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातकापणीत अडथळा येत असून भातपीक शेतकऱ्यांच्या हातुन निसटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com