Success Story: रायगडच्या लेकीची आकाशाला गवसणी! सानिका पांगारेची विमान क्षेत्रात भरारी, शिष्यवृत्तीची साथ अन् जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Sanika Pangare Success Story From Rural Raigad to Air India: शिष्यवृत्तीने दिले शिक्षणाला बळ, सानिकाने गाठले यशाचे शिखर; रायगडच्या मुलीची एअर इंडियात निवड
Raigad Girl Sanika Pangare Selected as Junior Service Engineer at Air India After Completing Aircraft Maintenance Engineering Education

Raigad Girl Sanika Pangare Selected as Junior Service Engineer at Air India After Completing Aircraft Maintenance Engineering Education

sakal

Updated on: 

-अमित गवळे

पाली: "जिद्द, चिकाटी आणि योग्य वेळी मिळालेली संधी असेल, तर ग्रामीण भागातील मुलगीही आकाशाला गवसणी घालू शकते," हे रायगडच्या एका होतकरू लेकीने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे. सुधागड तालुक्यातील शिळोशी या छोट्याश्या गावची कन्या सानिका अश्विनी सुहास पांगारे हिची विमान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘एअर इंडिया’मध्ये ‘ज्युनियर सर्व्हिस इंजिनिअर’ या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. स्वदेस फाउंडेशनच्या ‘एक्सलन्स स्कॉलरशिप’च्या भक्कम आधारामुळे तिचा हा खडतर पण प्रेरणादायी प्रवास यशस्वी होऊ शकला आहे.

Loading content, please wait...