esakal | MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती

MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : स्वप्नील लोणकर (swapnil lonkar) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर स्पर्धा परीक्षांशी संबधित निर्णय घेण्यास राज्य सरकारने तयारी दाखवली. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी या मुद्दयांवरून राज्यसरकावर निशाणा साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या (MPSC) जागा भरणार असल्याची घोषणा केली. दरम्यान MPSC परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार संभाजीराजे (sambhaji raje) यांची काल आणि आज भेट घेतली. या विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर बनत असल्याने सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी विनंती संभाजीराजे यांना ट्वीट करून केली आहे.

यात ते म्हणतात, MPSC परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्टमंडळं काल व आज भेटण्यास आले होते. या विद्यार्थ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. माझी सरकारला विनंती आहे, कुणावरही अन्याय न होता तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याकरीता उपमुख्यमंत्री यांनी १३ जुलै रोजी बोलविलेल्या बैठकीस SEBC उमेदवारांच्या दोन्ही बाजूंच्या किमान २ प्रतिनिधींना बोलवणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी राज्यसरकारला केले आहे.

हेही वाचा: पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

loading image