मयेकरांच्या चित्रांचे रेल्वेमंत्री प्रभूंकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

मालवण ः येथील चित्रकार संतोष मयेकर यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन 21 ते 26 या कालावधीत मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी या ठिकाणी भरविण्यात आले आहे. संतोष यांच्या चित्रांचे थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भेट देऊन कौतुक केले आहे आणि खासकरून मालवणचा कलाकार असल्याने प्रभू यांनी त्यांचे अभिनंदनही केले.

कोकणचा निसर्गरम्य प्रदेश चित्रांतून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मयेकर यांनी आपल्या कुंचल्यातून केला आहे. ऍप्लाइड आर्टच्या मुशीत तयार झाल्याने ही चित्रे बघणाऱ्याशी सहज संवाद साधतात.
चित्रांतील रंगसंगती आणि त्याद्वारे साधला जाणारा थोडासा "इंप्रेशनिस्ट'कडे झुकणारा एकंदरीत दृश्‍य परिणाम हा मनास भुरळ घालतो. मालवण, राक गार्डन, तारकर्लीचे समुद्रकिनारे हा एकच प्रश्‍न धागा पकडून केलेली ही बहुविध चित्रनिर्मिती पाहता मयेकरांचा आवाका लक्षात येईल.

प्रा. मयेकरांच्या कलाशिक्षणावर कोकण, कोल्हापूर आणि जे. जे. स्कूल या परंपरांचे संस्कार झालेले आहेत. जे. जे. ऍप्लाइड आर्टमधून एमएफए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे. जे.तच रहेजा आर्ट येथे त्यांनी काही वर्षे अध्यापन केले. निसर्गात राहून निसर्गाचे चित्रण करताना आपणही "त्या'च्याशी एकरूप झालेलो असतो व त्यांचाच एक अंश बनून जातो, असेही मयेकर यांनी सांगितले.

Web Title: santosh mayekar's painting appreciated